शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लिपिकाच्या त्रासाला कंटाळून बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 15:59 IST

तालुक्यातील उंडनगाव येथील एका अल्पवयीन मुलीने सोमवारी रात्री राहत्या घरी आत्महत्या केली.

सिल्लोड (औरंगाबाद ) : तालुक्यातील उंडनगाव येथील एका अल्पवयीन मुलीने सोमवारी रात्री राहत्या घरी आत्महत्या केली. सिल्लोड येथील एका खाजगी शाळेत क्लर्क असलेल्या संजय घुगरे याच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकाने अजिंठा पोलीस स्थानकात केली आहे. 

प्रणाली कृष्णा जाधव (१७ ) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती पालोद येथील महाविद्यालयात १२ वीचे शिक्षण घेत होती. या प्रकरणी अजिंठा पोलीस स्थानकात दाखल तक्रारी नुसार, संजय घूगरे ( रा. घटांब्री ) हा सिल्लोड येथील रामकृष्ण विद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे. तो दररोज बसने येणेजाणे करतो. प्रणालीसुद्धा उंडनगाव येथून शिक्षणानिमित्त पालोद येथे बसने येणेजाणे करत असे. या दरम्यान, संजय तिची बसच्या प्रवासात रोज छेड काढत असे. मी म्हणेल तसे वाग नसता माझ्याकडे तुझे फोटो आणि व्हिडीओ आहे ते सोशल मीडियात व्हायरल करेल, तुझी आणि तुझ्या कुटुंबाची बदनामी करेल अशी धमकी देत असे. या रोजच्या त्रासाला प्रणाली कंटाळली होती. तिने याबाबत तिच्या पालकांना सांगितले असता त्यांनी संजयला समजावले होते. मात्र त्याने छेडछाड बंद केली नाही. यामुळे प्रणालीने आत्महत्या केल्याची तक्रार कृष्णा जाधव यांनी पोलिसात केली आहे. 

शाळेच्या निरोप संमारंभात दिली धमकी सोमवारी प्रणालीचा पालोद येथील महाविद्यालयात निरोप समारंभ होता. यावेळी संजय घुगरे या कार्यक्रमात आला. त्याने प्रणालीला परत बदनामीची धमकी दिली. यानंतर घरी येताच सायंकाळी प्रणालीने आत्महत्या केली. 

आरोपीला घेतले ताब्यात प्रणालीच्या आत्महत्येनंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र आरोपी संजय घुगरे यास ताब्यात घेतल्या शिवाय प्रेत ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. यामुळे येथे काही काळ तणाव होता. पोलिसांनी घुगरेला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.