शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
4
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
5
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
6
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
7
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
8
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
9
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
10
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
11
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
12
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
13
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
14
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
15
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
16
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
17
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
18
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
19
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
20
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर

मराठवाड्यातून चौघांनाच मंत्रीपदाची लॉटरी; निलंगेकर, लोणीकर, शिरसाट ‘वेट ॲण्ड वॉच’वर

By नंदकिशोर पाटील | Updated: August 10, 2022 17:40 IST

मराठवाड्यात २६ सत्ताधारी आमदार, सहा जिल्हे मंत्रिपदापासून वंचित 

औरंगाबाद: राज्य मंत्रिमंडळात मराठवाड्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन प्रतिनिधित्व मिळाले असून उर्वरित सहा जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार पुढील विस्तारात संधी मिळेल या आशेवर आहेत. या प्रदेशात भाजपचे सोळा तर शिंदे समर्थक आमदारांची संख्या दहा आहे. संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, अतुल सावे आणि तानाजी सावंत या चौघांची वर्णी लागल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला तर दुसरीकडे भाजपचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, बबनराव लोणीकर यांच्यासह शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना संधी न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

राज्यातील सत्तांतरात मराठवाड्यातील आमदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार या मंत्र्यांसह दहा आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात सामील झाले. पैकी भुमरे आणि सत्तार यांना मंत्रिपदाची बक्षिसी मिळाली आहे. संजय शिरसाट यांचा पत्ता ऐनवेळी कसा कटला, या बद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिरसाट यांना कदाचित विधानसभेचे उपाध्यक्ष पद मिळू शकते.

मराठवाड्यात भाजपचे सोळा आमदार आहेत. पैकी एकमेव अतुल सावे (औरंगाबाद) यांना संधी मिळाली आहे. माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, बबनराव लोणीकर यांना कदाचित पुढील विस्तारात संधी मिळण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातून निलंगेकर की अभिमन्यू पवार, असाही भाजपपुढे पेच आहे. कारण दोघेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातून तानाजी सावंत (परंडा) यांची वर्णी लागल्याने या जिल्ह्याचा खूप दिवसांचा अनुशेष भरुन निघाला आहे. तर लातूरसह नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि बीड हे सहा जिल्हे मंत्री पदापासून वंचित आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच नांदेड आणि हिंगोली दौऱ्यावर होते. त्यामुळे आ. बालाजी कल्याणकर व आ. संतोष बांगर यांच्या समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

‘मविआ’त होते सात मंत्रीमहाविकास आघाडी सरकारमध्ये अशोक चव्हाण, अमित देशमुख, राजेश टोपे, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि संजय बनसोडे असे सात जण मंत्री होते.

औरंगाबाद जिल्ह्याला लाॅटरी !मंत्रिमंडळ विस्तारात औरंगाबाद जिल्ह्याला लाॅटरी लागली आहे. शिंदे गटाचे संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांच्यासह भाजपचे अतुल सावे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या रणनीतीचा भाग म्हणून सावे यांची वर्णी लागली असण्याची शक्यता आहे.

सत्तारांनी मारजी बाजीटीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावे आल्याने त्यांचे मंत्रिपद हुकणार, अशी चर्चा वृत्त वाहिन्यांवर सुरू होती. मात्र, सत्तारांनी मंत्रिपद मिळवून अनेकांना धक्का दिला. सत्तार हे मागील सरकारमध्ये मंत्री होते. मंत्रिपद सोडून ते शिंदे गटात सामील झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी सिल्लोड येथे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्याची बक्षिसी सत्तार यांना मिळाली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारSanjay Shirsatसंजय शिरसाटsambhaji nilangekarसंभाजी निलंगेकरBabanrao Looneykarबबनराव लोणीकर