शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

व्यवहार लाखोंचे, खरेदीखत मात्र केवळ काही हजारांचे...!

By admin | Updated: September 8, 2015 00:37 IST

औरंगाबाद : मकबरा परिसरातील पहाडसिंगपुरा येथील जमिनीवरील अवैध ले-आऊटमधील भूखंड विक्री करून सामान्य नागरिकांना कोट्यवधींना गंडा घालणाऱ्या

औरंगाबाद : मकबरा परिसरातील पहाडसिंगपुरा येथील जमिनीवरील अवैध ले-आऊटमधील भूखंड विक्री करून सामान्य नागरिकांना कोट्यवधींना गंडा घालणाऱ्या भूखंड माफियांनी हे व्यवहार काही हजारांचे असल्याचे दाखवून कोट्यवधी रुपयांची स्टॅम्प ड्यूटी चुकविली आहे. केवळ ५० ते १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर हा व्यवहार करून नोटरीसमक्ष हे व्यवहार केले.फसवणूक झालेले रामदास ढोले यांनी राजू तनवाणी, राज आहुजा यांच्याकडून रेणुकामातानगर या ले-आऊटमधील २००५ मध्ये एक भूखंड १ लाख ४५ हजार रुपयांना खरेदी केला होता. या भूखंड खरेदी विक्रीची बॉण्ड पेपरवर नोटरी करून देताना आरोपींनी तो केवळ ३५ हजार रुपयांत विक्री केल्याचे नमूद केले. एवढेच नव्हे तर ढोले यांनी २००८ मध्ये आणखी एक भूखंड ३ लाख ४५ हजार रुपयांत खरेदी केला. या व्यवहाराचा बॉण्ड पेपर बनविताना तो केवळ ७० हजार रुपयांत ढोले यांना कायमस्वरूपी विकल्याचे नमूद केले. अशा प्रकारे या वसाहतीमधील २१० भूखंड विक्री केलेले आहेत आणि हे सर्व व्यवहार अशाच प्रकारे दाखविल्याचे नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर केलेल्या कागदपत्रात नमूद आहे. ५० ते १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर त्यांनी हे व्यवहार केलेले आहेत. जमिनीचा कोणताही व्यवहार करताना शासनास स्टॅम्प ड्यूटी भरणे बंधनकारक आहे, असे असताना तनवाणी- आहुजांनी कोट्यवधी रुपये कमावून शासनाची मोठी फसवणूक केली. कोणत्याही मोठ्या उलाढालीवर आयकर विभागाची नजर असते. मात्र हे व्यवहार आयकर विभागाच्या नजरेस येऊ नयेत, यासाठी त्यांनी रजिस्ट्री (खरेदीखत) न करता नोटरीद्वारे प्लॉटची विक्री करून कोट्यवधी रुपये कमावले.