औरंंंगाबाद : जिल्हा परिषद आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांनी कंत्राटी वाहनचालकांच्या नावे तब्बल २० महिन्यांचे २२ लाख ५० हजार रुपये एवढी वेतनाची रक्कम हडप केली आहे. विशेष म्हणजे, ज्या वाहनचालकांना ‘एनआरएचएम’ अंतर्गत शासनाकडून वेतन अदा केले जाते, पुन्हा त्याच वाहनचालकांना कंत्राटी दाखवून वेतनाची ही रक्कम हडप केल्याचा प्रताप समोर आला आहे. झाले असे की, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात सन २००५ पासून कंत्राटी पद्धतीने वाहनचालक नेमण्याची पद्धत सुरू झाली. जिल्हा परिषदेत २००५ ते २०११ पर्यंत एका पुरवठादार संस्थेला तर २०११ ते २०१५ पर्यंत दुसऱ्या पुरवठादार संस्थेला कंत्राटी तत्त्वावर वाहनचालक पुरवठा करण्याचा आरोग्य विभागाने ठेका दिला होता. जिल्ह्यातील ५० प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेसाठी ५० कंत्राटी (पान २ वर)
वाहनचालकांच्या नावे लाखोंचे वेतन हडपले
By admin | Updated: May 4, 2016 01:29 IST