शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोट्यवधींचे फटाके ग्राहकांच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:07 IST

औरंगाबाद : दिवाळीनिमित्त शिवाकाशीहून १० ट्रक फटाके शहरात दाखल झाले आहेत. सुमारे ७ कोटींचे फटाके विक्रीसाठी उपलब्ध आहेत; मात्र ...

ठळक मुद्देदिवाळी : फटाका मार्केटमध्ये आदल्या दिवशी शुकशुकाट

औरंगाबाद : दिवाळीनिमित्त शिवाकाशीहून १० ट्रक फटाके शहरात दाखल झाले आहेत. सुमारे ७ कोटींचे फटाके विक्रीसाठी उपलब्ध आहेत; मात्र ग्राहकांनी पाठ फिरविल्याने लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी फटाका बाजारात शुकशुकाट जाणवत होता.रेल्वेस्टेशन रोडवरील अयोध्यानगरी येथील फटाका बाजारात दिवसभर तुरळक ग्राहकी दिसून आली. अनेक दुकाने अशी होती की तिथे सायंकाळपर्यंत बोहणीही झाली नव्हती. ग्राहकांनी पाठ फिरविल्याने शुकशुकाट जाणवत होता. जे ग्राहक खरेदीसाठी आले होते त्यांचा कल कमी आवाजाचे फटाके खरेदी करण्याकडे होता. त्यातील अनेक जण लहान मुलांपुरतेच फटाके खरेदी करताना दिसून आले. अनार, भुईचक्र, रंगीत सुरसुऱ्या, फटाक्यांची लड, रॉकेट खरेदी केले जात होते. खरेदीला गर्दी होत नसल्याने विक्रेत्यांच्या चेहºयावर चिंता स्पष्टपणे दिसून येत होती. फटाके विक्रेते संघटनेचे अध्यक्ष गोपाळ कुलकर्णी यांनी सांगितले की, न्यायालयाने फटाके फोडण्यास वेळेची मर्यादा घातली आहे, तसेच समाजसेवी संस्थेने व शाळांमधून वायू व ध्वनी प्रदूषणाबद्दल जनजागृती करण्यात आली. याचा मोठा परिणाम फटाके विक्रीवर झाला आहे, तसेच पूर्वी ५ टक्के एलबीटी लागत असे, आता १८ टक्के जीएसटी भरावा लागत आहे. यामुळेही फटाक्यांच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे जे ग्राहक येत आहेत तेही हात आखडता घेत आहेत. आता सर्व मदार लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच्या विक्रीवर टिकून आहे.चौकटशहरात विनापरवाना फटाके विक्रीफटाके विक्रीसाठी पोलीस आयुक्तांनी शहराच्या बाहेर जागा ठरवून दिल्या आहेत. तिथेच परवानगी घेऊन फटाके विक्री करणे अपेक्षित आहे; मात्र जुना मोंढा, शहागंज व शहराच्या काही भागांत हातगाड्यांवर विनापरवाना फटाके विकले जात आहेत. विशेष म्हणजे यात सुतळी अ‍ॅटमबॉम्ब, रॉकेट, फटाक्यांच्या लडींचाही समावेश आहे. स्वस्तात मिळत असल्याने फटाके खरेदीसाठी हातगाड्यांभोवती गर्दी होती. विनापरवाना फटाके विक्रीकडे पोलिसांचे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे. येथे निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते, अशी भीतीही व्यापाºयांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022fire crackerफटाके