शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

मायलेकरास जिवंत जाळले

By admin | Updated: May 6, 2015 00:29 IST

परंडा : घर बांधकाम, विहिरीच्या कामासाठी माहेरहून दीड लाख रूपये घेवून ये म्हणून विवाहितेसह दोन वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर रॉकेल ओतून

परंडा : घर बांधकाम, विहिरीच्या कामासाठी माहेरहून दीड लाख रूपये घेवून ये म्हणून विवाहितेसह दोन वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची ह्दयद्रावक घटना देवंग्रा (ता़भूम) येथे मंगळवारी दुपारी घडली़ याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ हुंडाबळीच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे़याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, देवंग्रा (ता़भूम ह़मु़चिंचवड पुणे) येथील बळीराम जनार्धन सलगर यांची मुलगी छकुली उर्फ कल्पना (वय २७) हिचा देवंग्रा येथीलच लक्ष्मण बिरमल बरकडे याच्याशी २० मे २००९ रोजी विवाह झाला होता़ विवाहनंतर आदित्य नावाचा मुलगाही या दाम्पत्यास झाला़ मात्र, लग्नानंतर तीन वर्षांनी सासरच्या मंडळींनी विवाहिता कल्पना हिचा पैशासाठी जाच, मारहाण सुरू केली़ घराचे बांधकाम व विहिरीच्या कामासाठी दीड लाख रूपये घेवून ये म्हणून मंगळवारी दुपारी पती लक्ष्मण बिरमल बरकडे, सासू गंगुबाई बिरमल बरकडे, सासरा बिरमल गणपती बरकडे, दीर बापूराव बिरमल बरकडे, जाऊ स्वाती बापूराव बरकडे, नणंद आलकाबाई राजेंद्र टकले यांनी संगणमत करून कल्पना व तिचा दोन वर्षांचा मुलगा आदित्य याच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले़ या घटनेत गंभीररित्या होरपळलेल्या कल्पनासह आदित्यचा मृत्यू झाल्याची फिर्याद बळीराम जनार्धन सलगर यांनी परंडा पोलीस ठाण्यात दिली़ सलगर यांच्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०४ (ब), ४९८ (अ), ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोउपनि डी़पी़सानप हे करीत आहेत़ दरम्यान, हुंडाबळीच्या या घटनेने देवंग्रासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे़ (प्रतिनिधी)