शहरं
Join us  
Trending Stories
1
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
2
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
3
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
4
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
5
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
6
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
7
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
8
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
9
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
10
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
11
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
12
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
13
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
14
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
15
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
16
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
17
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
18
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
19
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
20
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं

बिलोलीतील कस्तुरबा गांधी विद्यालयाचे स्थलांतर पाणीपुरवठ्याअभावी रखडले

By admin | Updated: July 25, 2014 00:31 IST

बिलोली : पाणीपुरवठ्याची ठोस योजना नसल्याने बिलोलीतील कस्तुरबा गांधी शाळा बाह्य मुलींच्या विद्यालयाचे नूतन इमारतीत स्थलांतर रखडले आहे.

बिलोली : पाणीपुरवठ्याची ठोस योजना नसल्याने बिलोलीतील कस्तुरबा गांधी शाळा बाह्य मुलींच्या विद्यालयाचे नूतन इमारतीत स्थलांतर रखडले आहे. दीडशे मुलींसाठीची इमारत तयार असून पाणीपुरवठ्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. अर्धवट शाळा सोडून दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून शासनाने सात वर्षांपूर्वी बिलोली तालुका पातळीवर कस्तुरबा गांधी निवासी विद्यालयाचे निर्माण केले होते. प्रारंभी सेवाभावी संस्थाकडून विविध प्रस्ताव मागविण्यात आले. पात्रतेनुसार संबंधित संस्थांना अशा शाळा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र बिलोलीसाठी मंज़ूर शाळा खतगावकर आणि एंबडवार यांच्या उच्चन्यायालयीन लढाईनंतर संस्थेऐवजी स्थानिक शिक्षण विभागाकडे सोपविण्यात आली. तहसीलदार अध्यक्ष, गटशिक्षणाधिकारी पदसिद्ध सचिव म्हणून नेमण्यात आले. पाचवी ते दहावीपर्यंत वर्गही सुरु झाले. शाळा गांधीनगरच्या परिसरात भाड्याच्या इमारतीमध्ये आहे. शाळेसाठी स्वतंत्र मालकीच्या इमारतीसाठी अनुदान मंजूर झाले. इमारतीसाठी उंच टेकडीवर मोकळी जागा देण्याचा निर्णय महसूल प्रशासनाने घेतला. प्रारंभी बांधकामासाठी पाणी नसल्याने ठेकेदाराने रडत- रडत काम केले. अर्धवट सोडून नंतर तो निघून गेला. दोन वर्षांनंतर दुसऱ्या ठेकेदाराडून इमारतीचे काम करुन घेण्यात आले. टँकरद्वारे पाणी आणून काम पूर्ण झाले. संपूर्ण मुलींसाठी शिकवणी खोल्या, कार्यालय, स्वयंपाक घर, स्वच्छतागृह, वसतिगृह, प्रयोगशाळा, हॉल आदींचे काम पूर्ण झाले. भाड्याच्या इमारतीमधील शाळा रिकामी करुन जून १४ च्या शैक्षणिक वर्षांपासून नूतन इमारतीमध्ये शाळा स्थलांतरीत करावी, असे आदेश नांदेड जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी संबंधितांना दिले. मात्र पाण्याअभावी शाळा कशी स्थलांतरीत करावी, ही समस्या उभी राहिल्याने स्थलांतराचा प्रश्न रखडला आहे. सुरक्षा रक्षकाची आवश्यकतासद्यस्थिीतील भाड्याची इमारत व शाळा गांधीनगरच्या मध्यवस्तीत आहे. शेजारी इमारत आणि उचभ्रू वस्ती आहे. त्यामुळे येथे भितीचे वातावरण नाही, पण नूतन इमारत उंच टेकडीवर असून पाठीमागे वनखात्याची जमीन आहे. येथे दिवसादेखील निर्मणुष्य परिस्थिती असते. अद्याप तरी कस्तुरबा विद्यालयाकडे कोणत्याही सुरक्षा रक्षकाची नियुक्ती झालेली नाही. मुलींना शिकविणाऱ्या सर्वच महिला शिक्षिका आहे, अशा स्थितीत कोणती घटना होईल. हे सांगता येत नाही. मुलींच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने येथे बंदूकधारी सुरक्षा रक्षकाची गरज आहे, असे मुख्याध्यापिका जी. आर. सावळे यांनी सांगितले. बिलोली पालिका पाणी पुरवठा करेल, असे आश्वासन पालिका प्रशासनाडून आल्यानंतरच येथे इमारत पूर्ण करण्यात आली. सध्या पाण्याची सोय न झाल्यानेच स्थलांतर थांबले आहे. संपूर्ण मूलभूत सुविधा पूर्ण झाल्याची खात्री पटल्यानंतरच निवासी शाळा हलविण्यात येईल- माधव सलगर, गटशिक्षणाधिकारी तथा सचिवबिलोली शहरवासीयांनाच मागील दोन वर्षांपासून एक- दिवस आड व एकच वेळ पाणीपुरवठा होत आहे. बिलोलीच्या जलकुंभातून पाणी देणे शक्यच नाही. शाळा प्रशासनाने स्वतंत्र उपायायोजना हाती घ्यावी. त्यात उंच टेकडीवर पाणीपुरवठा कसे शक्य आहे- भीमराव जेठे, नगरसेवक, माजी नगराध्यक्षकोणत्याही अप्रिय घटना नाकारता येत नाहीत. राज्यासह देशात महिला अत्याचाराबाबतच्या घटना आपण दररोज पाहत आहोत. मुलींच्या सुरक्षिततेसाठी २४ तास रक्षकाची कायम नियुक्ती करावी- जमनाबाई खंडेराय, नगराध्यक्षा, बिलोली