शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमधील स्थलांतरित मजूर पुन्हा परतले शहरात; रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 17:55 IST

शहरात बांधकाम आणि इतर कामांवर अधिक मजुरी 

ठळक मुद्देजिल्ह्यात १० लाख जॉबकार्ड ग्रामीण भागात रोहयोची कामे सुरु आहेत.

औरंगाबाद : कोरोनात लॉकडाऊनमुळे शहरातून गावी परत आलेल्या  बेरोजगार १० जणांनी रोजगार हमी योजनेसाठी नोंदणी केली; परंतु कोरोनाचा प्रभाव कमी होताच स्थलांतरितांनी पुन्हा गाव सोडून शहर गाठले आहे. इतरत्र रोजगार उपलब्ध झाल्याने रोहयोची मजूर संख्या आणि कामांची संख्या घटली आहे. रोहयोच्या कामांसाठी १० लाखांच्या आसपास जॉबकार्ड सध्या तयार आहेत. कोरोना काळात स्थलांतरितांनी रोहयोच्या कामासाठी मोठी नोंदणी केली होती. सध्या रोहयोवरील मजूर परिसरातीलच आहेत, असा दावा रोहयो विभागाने केला आहे. 

मजूर घटणे म्हणजे इतरत्र रोजगार मिळणे१५ डिसेंबर २०१९ पर्यंतच्या कामांचा आणि मजूर उपस्थितीचा आढावा घेतला तर यंदा मजूर आणि कामे कमी झाल्याचे दिसते. रोहयोच्या कामांवर मजूर संख्या घटणे म्हणजे इतरत्र जास्त मजुरी मिळणे असा होतो. कोरोनामुळे रोजगार स्थिर राहावा, नागरिकांची धावपळ होऊ नये म्हणून विविध कामे समाविष्ट करून योजना राबविली. आता सर्व काही सुरळीत झाल्यामुळे मजूर संख्या घटल्याचे दिसते आहे. शहरातून गावाकडे आलेले पुन्हा शहरात गेले आहेत, असे रोहयो उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य यांनी सांगितले. 

रोहयोची कामे झाली कमी रोजगार हमी योजनेवर या वर्षात मजुरांची संख्या कमी झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर ते ग्रामीण स्थलांतर मोठ्या प्रमाणात झाले. मजूर ग्रामीण भागात परतले मात्र या मजुरांना काम मिळणे अशक्य होते. राज्य सरकारने कोरोनाच्या काळात रोहयोची कामे सुरु केली खरी पण कोरोनाच्या सावटामुळे रोहयोच्या कामांवर मजूर वाढले नाहीत. परिणामी रोहयोची कामे कमी झाली. कृषी, फळबाग, ग्रामपंचायत, गायगोठा शेड, गॅबियन बंधारा, घरकुल, बिहार पॅटर्न, वैयक्तिक सिंचन विहीर, शोषखड्डे, सार्वजनिक विहीर, तुती लागवड, रोपवाटिका, बांधावरील वृक्षलागवड, रस्ता दुतर्फा करण्याची कामे सध्या सुरू आहेत. कोरोनामुळे वैयक्तिक लाभाची कामे यंदा आणली.

शहरात बांधकाम आणि इतर कामांवर अधिक मजुरी ग्रामीण भागात रोहयोची कामे सुरु आहेत. मात्र आता शहरात बांधकाम आणि इतर कामांवर अधिक मजुरी मिळत असल्याने अनेकजण तिकडे धाव घेत आहेत. आम्हाला शहरी भागात राहणे परवडत नाही म्हणून कमी मजुरी मिळाली तरी येथे काम करणे परवडते. - विष्णू राक्षे, रोहयो मजूर

टॅग्स :AurangabadऔरंगाबादLabourकामगार