शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या लपंडावाने एमआयडीसी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:10 IST

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत विजेचा लपंडाव सुरूच आहे. मंगळवारी (दि.१७) सकाळी १० वाजता वीज गुल झाल्याने ८५ युनिटचे कामकाज तासभर ठप्प झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत विजेचा लपंडाव सुरूच आहे. मंगळवारी (दि.१७) सकाळी १० वाजता वीज गुल झाल्याने ८५ युनिटचे कामकाज तासभर ठप्प झाले. एका फिडरमुळे दररोज वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार होत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत असल्याचे उद्योजकांनी म्हटले.चिकलठाण्यातील रेडियंट अ‍ॅग्रो फिडरसंदर्भात गेल्या दोन वर्षांपासून उद्योजकांकडून पाठपुरावा सुरूआहे; परंतु त्यावर काहीही तोडगा निघत नाही, त्यामुळे या फिडरवरील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. वेळेवर वीज बिल भरण्यास प्राधान्य दिले जाते; परंतु त्या तुलनेत सुविधा मिळत नसल्याची ओरड उद्योजकांकडून होत आहे. या अडचणींमुळे १० जुलै रोजी उद्योजकांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्याची भेट घेऊन वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी चिकलठाणा एमआयडीसीत वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार होतो. येथील रेडियंट अ‍ॅग्रो आणि अन्य फिडरची दुरुस्ती करण्यात यावी, शेंद्रा औद्योगिक वसाहतीत दुरुस्ती व देखभाल केंद्र सुरूकरणे, वाळूज येथील गट क्रमांक २२ व २३ मधील उद्योजकांना वीजपुरवठा करण्यासाठी अतिरिक्त फिडरची व्यवस्था करणे, पावसाळ्यात पुरवठा सुरळीत राहील यासाठी दक्षता घेणे, आदी मागण्या करण्यात आल्या. मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन उद्योजकांना देण्यात आले; परंतु अद्यापही दररोज वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार सुरूच आहे.पावसामुळे सोमवारी रात्रीदेखील येथील पुरवठा तासभर बंद झाला होता. त्यानंतर रेडियंट अ‍ॅग्रो फिडरमधील नादुरुस्तीने मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास वीजपुरवठा बंद पडला. तासभर वीजपुरवठा बंद होता, त्यामुळे कामकाज विस्कळीत झाले. परिणामी नुकसानीला सामोरे जावे लागल्याचे उद्योजकांनी म्हटले. वीज गेल्यानंतर उद्योजकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. तेव्हा यंत्रणा जुनी झाल्याचे अजब उत्तर देण्यात आल्याचे उद्योजकांनी सांगितले. नादुरुस्तीमुळे फिडर बंद पडले होते. तात्काळ दुरुस्ती करण्यात आल्याचे महावितरणच्या अभियंत्यांनी सांगितले.

टॅग्स :MIDCएमआयडीसीmahavitaranमहावितरण