शहरं
Join us  
Trending Stories
1
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
2
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
3
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
4
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
5
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
6
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक
7
प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय; बिहार विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार, कारण काय..?
8
अ‍ॅश्ले टेलिस यांना ट्रम्प भारतात राजदूत बनवणार होते, अचानक हेरगिरी प्रकरणी अटक; चीनशी कनेक्शनचा आरोप
9
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
10
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
11
सोने नव्हे, चांदीची किंमत 'रॉकेट' वेगाने का वाढतेय? पांढरा धातू २,६९,००० प्रति किलोवर पोहोचणार?
12
फायद्याची गोष्ट! हात धुण्याची योग्य पद्धत माहितीय का? ९९% लोक करतात 'या' छोट्या चुका
13
क्रेडिट कार्ड बंद केल्यानं तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? बंद करण्यापूर्वी जाणून घ्या काही महत्त्वाची गोष्टी
14
बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना
15
'कौआ बिर्याणी'च्या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेला हा अभिनेता आठवतोय का?, एकेकाळी विकायचा साडी
16
शेतकऱ्यांसाठी दिवाळी भेट! पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी येणार? तुमचे नाव यादीत असे घरबसल्या तपासा
17
Gold Price Impacts on buying: किंमती वाढल्या तरी सोनं खरेदी करणं थांबवत नाहीत भारतीय; पण यावेळी झालाय परिणाम, जाणून घ्या
18
धक्कादायक! ३ लाखाचा प्लॉट ३० लाखाचा झाला; जावयाने पैसे मागितले, पत्नी-सासूने मिळून गेम केला
19
Tanya Mittal : तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप
20
Guru Gochar 2025: १८ ऑक्टोबरपासून गुरूचे अतिचारी भ्रमण; स्वामीकृपेने डिसेंबरपर्यंत शुभ काळ!

मायक्रोसॉफ्ट गडबडले; विमाने रद्द झाल्याने पर्यटनासह विधी, व्यापार, उद्योग क्षेत्रास फटका

By सुमित डोळे | Updated: July 20, 2024 11:57 IST

शुक्रवारी सकाळीच मायक्रोसाॅफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाला आणि जगाला मोठा धक्का बसला. आयटी कंपन्यांसह बँक, शेअर मार्केट व विमान सेवेवर याचा सर्वाधिक परिणाम झाला.

छत्रपती संभाजीनगर : मायक्रोसॉफ्टच्या तंत्रज्ञानामध्ये झालेल्या बिघाडाचा जगभरात परिणाम झालेला असताना शहरातदेखील विमान पर्यटनाला मोठा फटका बसला. अनेक उद्याेजक, व्यापाऱ्यांसह वकिलांचे ठरवलेले नियोजन बिघडल्याने मनस्ताप सहन करावा लागला. याचा सर्वाधिक परिणाम इंडिगो एअरलाइन्सच्या प्रवाशांना बसून शुक्रवारच्या सायंकाळसह शनिवारच्या सकाळचे मुंबईचे उड्डाण रद्द करण्यात आल्याने अनेकांना नुकसानाचा फटका सहन करावा लागला.

शुक्रवारी सकाळीच मायक्रोसाॅफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाला आणि जगाला मोठा धक्का बसला. आयटी कंपन्यांसह बँक, शेअर मार्केट व विमान सेवेवर याचा सर्वाधिक परिणाम झाला. संगणक, लॅपटॉपवर अचानक ब्लू स्क्रीन आल्याने बहुतांश देशांमधील व्यवहार ठप्प झाले. त्याचा थेट परिणाम शहरातील विमानसेवेवरदेखील झाला. सायंकाळी दिल्ली, हैदराबाद, अहमदाबादसाठी जाणाऱ्या प्रवाशांची माेठी गर्दी विमानतळावर होती. रोज घड्याळाच्या काट्यावर चालणारे विमानतळाचे कामकाज ठप्प झाल्याने धावपळ उडाली.

या विमानांवर सर्वाधिक परिणामविमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, इंडिगो कंपनीचे अहमदाबादचे विमानाचे सुरळीत उड्डाण झाले. तर दिल्ली व हैदराबादसाठीच्या इंडिगो विमानाला एक तासाने विलंब झाला. एअर इंडियाचे दिल्लीचे विमानदेखील वेळेत होते.

इंडिगोच्या प्रवाशांच्या वाट्याला सर्वाधिक मनस्तापमायक्रोसॉफ्टच्या तांत्रिक बिघाडाचा भारतात सर्वाधिक फटका इंडिगो एअरलाइन्स व क्रमाने त्यांच्या प्रवाशांना बसला. इंडिगोची शुक्रवारची सायंकाळची व मुंबईची सकाळची विमानाचे उड्डाण रद्द झाले. शिवाय, दिल्ली व हैदराबादच्या इंडिगोच्या प्रवाशांना एक तासापेक्षा अधिक विमानतळावर उड्डाणाची वाट पाहत बसावे लागले. परिणामी, पुढील सर्वच नियोजन हुकल्याने त्यांनीदेखील मनस्ताप व्यक्त केला. दरम्यान, अन्य कंपन्यांच्या सेवेवर तुलनेने कमी परिणाम झाला. याबाबत विमानतळ प्रशासनदेखील इंडिगोच्या व्यवस्थापनाला सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांनादेखील प्रतिसाद मिळाला नाही.

४० वर्षे मागे, बोर्डिंग पास मॅन्युअली करण्याची वेळसर्व्हरच बंद पडल्याने विमानसेवेत महत्त्वाची बोर्डिंग पास प्रक्रियाच बंद पडली. परिणामी, विमानतळावर बहुतांश प्रक्रिया मॅन्युअली म्हणजेच संगणकाशिवाय करण्याची वेळ व्यवस्थापनावर आली. सुरू विमानाच्या प्रवाशांच्या बोर्डिंग पासची प्रक्रिया हाताने करावी लागत होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता.

पर्यटकांनी रद्द केले येणेया बिघाडाचा पर्यटनासाठी शहरात आलेल्या विदेशी पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला. विमानसेवा सुरळीत होणे अनिश्चित असल्याने ४ पर्यटकांना कारने मुुंबईला जावे लागले. शनिवारी येणे नियोजित असताना अमेरिकेच्या काही पर्यटकांनी येणेच रद्द केल्याने पर्यटनावर मोठा परिणाम झाल्याचे टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेनशनचे अध्यक्ष जसवंत सिंग यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmicrosoft windowsमायक्रोसॉफ्ट विंडोtourismपर्यटन