शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

एमजीएम ते लक्ष्मण चावडी रस्ता २४ मीटर रुंद, घरे पाडण्याच्या नोटीसने कैलासनगरवासीयांची उडाली झोप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 19:10 IST

एमजीएम ते लक्ष्मण चावडीपर्यंत रस्ता तयार करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.

औरंगाबाद : कैलासनगर स्मशानभूमी रोडवरील घरे रस्त्यावरील अतिक्रमण ठरवून ती पाडण्यासंदर्भात मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाने मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्या. त्यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. २०११ मध्ये महापालिकेने १८ मीटर रस्ता रुंद करण्यासाठी अनेक घरे पाडली. आता हा रस्ता २४ मीटर रुंद असल्याच्या नोटिसा दिल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले.

एमजीएम ते लक्ष्मण चावडीपर्यंत रस्ता तयार करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून हे काम सुरू आहे. रस्त्यातील काही मालमत्ता रुंदीकरणात जात आहेत. काही ठिकाणी अतिक्रमणे आहेत. शहर विकास आराखड्यानुसार रस्ता कुठे १८ मीटर, तर काही भागात २४ मीटर रुंद आहे. २०११ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी शहरात रस्ता रुंदीकरण मोहीम राबविली होती, तेव्हा कैलासनगरातील रस्ता रुंद करण्यात आला होता. अनेक नागरिकांची घरे पाडण्यात आली होती. महापालिकेने याचा मोबदलाही टीडीआर स्वरूपात दिला. आता महापालिकेने येथील ५० पेक्षा अधिक नागरिकांना महापालिका अधिनियम कलम २६० अन्वये नोटिसा दिल्या. या नोटीसमध्ये रस्ता २४ मीटर रुंद असल्याचे म्हटले आहे. आपल्या मालमत्ता का पाडण्यात येऊ नये, असे त्यात म्हटले आहे. यासंदर्भात आपले म्हणणे ८ ते १५ दिवसांत महापालिकेकडे दाखल करावे असे अतिक्रमण हटाव विभागाच्या पदनिर्देशित अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. नोटिसा प्राप्त होताच परिसरात खळबळ उडाली. नऊ वर्षांपूर्वीच आमच्या मालमत्तांचा काही भाग महापालिकेने रुंदीकरणात घेतला. आता पुन्हा आम्हाला बेघर करणार का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. महापालिकेने पूर्वी रस्ता रुंद करताना १८ मीटरनुसार पाडापाडी केली होती. आता २४ मीटर म्हटले तर अनेकांची पूर्ण घरेच यामध्ये जाणार आहेत.

मनपाने मोजणी करावी२०११ मध्ये मार्किंग करून रस्ता रुंदीकरण केले. नागरिकांनी मनपा प्रशासनाला तेव्हा सहकार्य केले. आता पुन्हा आचनक २४ मीटर रस्ता असल्याचे सांगून नोटीस दिल्याने आमची झोप उडाली आहे. आधीच कोरोनाने अनेकांचा रोजगार गेला. व्यवसाय ठप्प झाला. आता राहते घरही जाणार ही भीती भेडसावत आहे. प्रशासनाने नागरिकांना वेठीस धरू नये.- बिपीन जावळे, नागरिक.

१८ आणि २४ मीटरचा वाद संपवाकैलासनगरातील गोरगरीब नागरिकांना नोटिसा दिल्या आहेत. मनपाने या भागात रस्ता नेमका १८ मीटर आहे का २४ मीटर हे निश्चित करावे. विनाकारण त्रास देऊ नये. यापूर्वी मनपाने अनेक गोरगरीब नागरिकांना बेघर केले. आता पुन्हा करू नये.भास्कर गिऱ्हे, नागरिक

मोजणी झालेली आहेरस्ता १८ मीटरपर्यंत कुठे आहे, पुढे २४ मीटर कुठे आहे, हे नगररचना विभागाने अलीकडेच मोजणी करून मार्किंगही केली आहे. अनेक नागरिकांनी मनपाला जागा हस्तांतरित केल्यावर पुन्हा अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे प्रशासनाने नोटिसा दिल्या. विनाकारण त्रास देण्याचा प्रश्नच येत नाही.- रवींद्र निकम, अतिरिक्त आयुक्त, मनपा.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका