शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
2
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
4
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
5
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
6
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
7
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
8
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
9
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
10
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
11
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
12
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
13
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
14
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
16
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
17
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
18
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
19
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
20
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब

एमजीएम, कन्नड संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:28 IST

एमजीएम स्पोटर््स क्लब मैदानावर आजपासून सुरू झालेल्या टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत यजमान एमजीएम आणि सुपरकिंग संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. संग्राम गट्टे आणि सलमान अहमद हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.

औरंगाबाद : एमजीएम स्पोटर््स क्लब मैदानावर आजपासून सुरू झालेल्या टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत यजमान एमजीएम आणि सुपरकिंग संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. संग्राम गट्टे आणि सलमान अहमद हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.एमजीएम संघाने लिप फास्टनर संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १७६ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून गिरीश गाडेकरने १ षटकार, ४ चौकारांसह ३३, मयूर जंगलेने ३ चौकार, एका षटकारासह ३६, शेखर ताठेने २४ धावा केल्या. अंकुश बोधगिरे व सम्राट गुट्टे यांनी अनुक्रमे २१ व २५ धावा केलया. लिप फास्टनरकडून राजू मदन, विक्रम चौधरी, सचिन पायार, राहुल पाटील व अमोल हाके याने प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात लिप फास्टनर संघ ८ बाद १७२ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून राहुल पाटीलने ६ चौकारांसह ४९, इंद्रजित उढाणने ६ चौकारांसह ४१ धावा केल्या. राजू मदन व सचिन पिसे यांनी अनुक्रमे १९ व १६ धावा केल्या. एमजीएम संघाकडून संग्राम गुट्टेने १२ धावांत ३ गडी बाद केले. सागर शेवाळे व अंकित चोकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.दुपारच्या लढतीत कन्नड सुपरकिंग संघाने प्रथम फलंदाजी करणाºया फ्रेण्डस् क्लबला १०६ धावांत रोखले. फ्रेण्डस् क्लबकडून अमर यादवने ४ चौकार, ३ षटकारांसह ५९ धावा केल्या. कन्नड सुपरकिंग्जकडून आनंद ठेंगे, शशिकांत कदम व हरमितसिंग यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात कन्नडने विजयी लक्ष्य ५.४ षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. त्यांच्याकडून सलमान अहमदने ७ चौकार व एका षटकारासह ४५ धावा केल्या. शशिकांत कदमने १९ व मझर पठाणने १७ धावा केल्या. फ्रेण्डस् क्लबकडून गौरव शिंदेने ३, तर ऋषिकेश नायरने २ गडी बाद केले. तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन एम.एस.ई.बी.चे सहव्यवस्थापक ओम प्रकाश बकोरिया, जिल्हा क्रिकेट संघटनेचे सहसचिव शिरीष बोराळकर, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. आशिष गाडेकर यांच्या उपस्थितीत झाले. या प्रसंगी मनीष पोलकम, जॉय थॉमस, कर्मवीर लव्हेरा, नीलेश हारदे, उदय बक्षी, गंगाधर शेवाळे, विष्णू बब्बीरवाल, जगदीश पटेल, दिनेश वंजारे, संग्राम देशमुख, शरद पवार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अमृत बिºहाडे यांनी केले.