शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

राहुल शर्माच्या स्फोटक फलंदाजीने मसिआ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:54 IST

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक करंडक औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत राहुल शर्मा याच्या चौफेर टोलेबाजीच्या जोरावर मसिआ संघाने लिप फास्टनर संघावर ८ गडी राखून मात केली. दुसºया समान्यात स्कोडा संघाने विजय मेहेत्रे याच्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर एनएचके संघावर ४ गडी राखून विजय मिळवला.

ठळक मुद्देविजय मेहेत्रेचे ४ बळी : इंद्रजित उढाणचे अर्धशतक

औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक करंडक औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत राहुल शर्मा याच्या चौफेर टोलेबाजीच्या जोरावर मसिआ संघाने लिप फास्टनर संघावर ८ गडी राखून मात केली. दुसºया समान्यात स्कोडा संघाने विजय मेहेत्रे याच्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर एनएचके संघावर ४ गडी राखून विजय मिळवला.सकाळच्या सत्रात मसिआ संघाविरुद्ध लिप फास्टनर संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १०० धावा केल्या. त्यांच्याकडून अनुभवी इंद्रजित उढाण याने ६५ चेंडूंत ८ चौकारांसह ६५ आणि राहुल पाटील याने ४३ चेंडूंत २९ धावा केल्या. मसिआ संघाकडून रोहन राठोड, रोहन मोरे व मधुर पटेल यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात मसिआ संघाने विजयी लक्ष्य १४.२ षटकांत एकही फलंदाज न गमावता ११४ धावा करीत गाठले. त्यात राहुल शर्मा याने चौफेर टोलेबाजी करताना ५५ चेंडूंतच ११ खणखणीत चौकार आणि प्रेक्षणीय ४ षटकारांसह नाबाद ८५ धावा करीत विजयात निर्णायक योगदान दिले. त्याला साथ देणारा संदीप भंडारी २ चौकारांसह १६ धावांवर नाबाद राहिला.दुसºया सामन्यात एनएचके संघ विजय मेहेत्रे याच्या सुरेख फिरकी गोलंदाजीसमोर १३.४ षटकांत ६० धावांत गारद झाला. एनएचके संघाकडून गौरव शिंदेने १४ व योगेश परदेशी याने १३ धावा केल्या. विजय मेहेत्रे याने ६ धावांत ४ गडी बाद केले. त्याला संदीप खोसरे याने २४ धावांत ३ व पवन कवाले याने ७ धावांत २ गडी बाद करीत साथ दिली. प्रत्युत्तरात स्कोडा संघाने विजयी लक्ष्य १०.४ षटकांत ६ फलंदाज गमावून पूर्ण केले. त्यांच्याकडून विकी निंबुरे याने नाबाद १२ व विजय मेहेत्रे याने १५ धावा केल्या.