शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सदस्या पतीचे ग्रा.पं.ला टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:30 IST

वाळूज ग्रामपंचायतीने दिलेल्या बचत गटाच्या जाहिरातीत नाव न टाकल्यामुळे नाराज झालेल्या महिला सदस्याच्या पतीने मंगळवारी सकाळी चक्क वाळूज कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढून मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : वाळूज ग्रामपंचायतीने दिलेल्या बचत गटाच्या जाहिरातीत नाव न टाकल्यामुळे नाराज झालेल्या महिला सदस्याच्या पतीने मंगळवारी सकाळी चक्क वाळूज कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढून मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले. कामानिमित्त आलेल्या नागरिकांची गैरसोय होऊन मनस्ताप सहन करावा लागला. वाळूज ग्रामपंचायतीत मानपान नाट्य रंगल्यामुळे नागरिकांची चांगलीच करमणूक होत आहे.ग्रामपंचायतीचे कर्मचारी मंगळवारी सकाळी १०.३० वाजता कार्यालयात आले. त्यांच्यापाठोपाठ ग्रामपंचायत सदस्या सायराबी पटेल यांचे पती हाफीज पटेल देखील आले. त्यांनी वादावादी करीत कर्मचाºयांना बळजबरीने कार्यालयाबाहेर काढले. त्यानंतर हाफीज पटेल यांनी कार्यालयाच्या चॅनल गेटला कुलूप लावून तेथून निघून गेले. ते बराच वेळ आले नाहीत. या वेळेत विविध कामानिमित्त आलेले नागरिक समोरच्या मैदानात बसले होते. दुपारी २ वाजले तरी कार्यालय उघडलेच नसल्यामुळे नाराजी व्यक्त करून नागरिक घरी निघून गेले.जाहिरातीत नाव न टाकल्यामुळे संतापसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सावित्रीबाई फुले लोक संचलित साधन केंद्र वाळूजची सर्वसाधारण सभा नुकतीच रांजणगाव येथे पार पडली होती. या केंद्राच्या माहिती पुस्तिकेत वाळूज व परिसरातील काही ग्रामपंचायतीच्या जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या होत्या. मात्र, वाळूज ग्रामपंचायतीच्या जाहिरातीत सदस्या सायराबी पटेल यांचे नाव टाकले नसल्यामुळे त्यांचे पतीराज हाफीज पटेल संतप्त झाले. त्यावरून त्यांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकल्याचे काही सदस्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.सरपंचाकडून सारवासारवसरपंच सुभाष तुपे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी माहिती पुस्तिकेत सायराबी पटेल यांचे नाव वगळल्याच्या कारणावरून हा प्रकार घडल्याची कबुली दिली आहे. ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एस. सी. लव्हाळे हे मंगळवारी रजेवर असून, सकाळी ग्रामपंचायतीचे कर्मचारी वसुलीसाठी गेले असल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय बंद असल्याचे सांगत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPoliticsराजकारण