लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने मराठवाड्यात ‘उमेद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे़ २२ मे रोजी दुपारी ३ वाजता खा़सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हॉटेल मयुरा येथे हा कार्यक्रम होईल़ लातूर जिल्ह्यातील २५ आणि मराठवाड्यातील २०० विधवा महिलांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे़ लातूर येथे होत असलेल्या कार्यक्रमाला जिवनराव गोरे, बसवराज पाटील नागराळकर, बाबासाहेब पाटील, पप्पू कुलकर्णी, संजय बनसोडे, मुफ्ती फय्याज अली, विनोद रणसुभे, रेखाताई कदम, भाग्यश्री क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे़ विधवा महिलांचे आर्थिक स्वावलंबन, त्यांच्या पाल्यांच्या शिक्षण, आरोग्यासाठी सहाय्य करण्यात येणार आहे़ कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मकरंद सावे यांनी केले आहे़
सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत मेळावा
By admin | Updated: May 20, 2017 23:41 IST