शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मनपा समावेशप्रकरणी सुनावणी पूर्ण

By admin | Updated: August 6, 2015 01:02 IST

औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषदेचा औरंगाबाद महापालिकेत समावेश करणाऱ्या अधिसूचनेस आव्हान देणाऱ्या याचिकेची सुनावणी खंडपीठाचे

औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषदेचा औरंगाबाद महापालिकेत समावेश करणाऱ्या अधिसूचनेस आव्हान देणाऱ्या याचिकेची सुनावणी खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. व्ही. के. जाधव यांच्या न्यायालयात बुधवारी पूर्ण झाली. न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. सातारा-देवळाई येथील रहिवासी राजेंद्र कानडे यांनी सातारा-देवळाई नगर परिषदेचा औरंगाबाद महापालिकेत समावेश करणाऱ्या १४ मे २०१५ च्या अधिसूचनेस आव्हान दिले आहे. महाराष्ट्र शासनाने सातारा-देवळाई ग्रामपंचायत बरखास्त करून २८ आॅगस्ट २०१४ रोजी तेथे नगर परिषदेची घोषणा केली. त्यानंतर लागलीच नगर परिषदेवर प्रशासकांची नियुक्ती केली. दरम्यान, महापालिकेची निवडणूक घोषित झाली. मनपाच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत मनपाची हद्द वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यात सातारा-देवळाई नगर परिषदेचा मनपा हद्दीत समावेश करण्याची शिफारस शासनास करण्यात आली. त्यानुसार शासनाने यासंदर्भात ११ फेब्रुवारी २०१५ रोजी प्राथमिक अधिसूचना काढली. त्याला जि. प. सदस्य विनायक हिवाळे यांनी खंडपीठात आव्हान दिले. याचिकेच्या सुनावणीच्या वेळी प्राथमिक अधिसूचनेस स्थगिती दिल्याचे निवेदन शासनाच्या वतीने करण्यात आले. यावरून खंडपीठाने याचिका निकाली काढली. याच संदर्भात अ‍ॅड. सतीश बी.तळेकर आणि अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर यांच्यामार्फत दुसरी याचिका दाखल करण्यात आली होती. दोन्ही याचिकांची एकत्रित सुनावणी झाली. शासनाच्या वतीने सहायक सरकारी वकील किशोर गाढवे पाटील यांनी काम पाहिले. शासनाने १४ मे २०१५ रोजी शासनाने अधिसूचनेद्वारे सातारा-देवळाई नगर परिषदेचा महापालिकेत समावेश केल्याचे जाहीर केले. या अधिसूचनेस राजेंद्र कानडे यांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात आव्हान दिले. याचिकाकर्त्याचे असे म्हणणे आहे की, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र नगर पंचायत अधिनियम १९६५चे कलम ६ नुसार सातारा नगर परिषद बरखास्तीची अधिसूचना काढली नाही. त्यामुळे सातारा-देवळाईचा महापालिकेत समावेश करणारी १४ मे २०१५ ची अधिसूचना बेकायदेशीर घोषित करून सातारा-देवळाई नगर परिषदेचे अस्तित्व कायम ठेवावे.