शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

शिवसेना नेते दिल्लीला गेल्याने फेरबदल,पराभवाच्या चिंतनाला खो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 16:25 IST

बैठक शेतकरी संपर्क अभियानावर चर्चा करून गुंडाळण्यात आली.

ठळक मुद्दे१४ जून रोजी शिवसेना भवन, मुंबईत संपर्क नेते आणि जिल्हाप्रमुखांची आढावा बैठक झाली. लोकसभा निवडणूक पराभव अनुषंगाने आयोजित बैठक पुढे ढकलण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद : जिल्ह्यातील शिवसेना संघटनेत फेरबदल आणि लोकसभा निवडणुकीच्या पराभवावर चिंतन करण्यासाठी शिवसेना भवन येथे आयोजित बैठकीत दोन्ही विषयांना ‘खो’ देण्यात आला. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे दिल्लीत असल्यामुळे शिवसेना भवन येथे झालेल्या त्या बैठकीला ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे पराभव चिंतन आणि फेरबदलाची बैठक शेतकरी संपर्क अभियानावर चर्चा करून गुंडाळण्यात आली.

१४ जून रोजी शिवसेना भवन, मुंबईत संपर्क नेते आणि जिल्हाप्रमुखांची आढावा बैठक झाली. या बैठकीत औरंगाबाद लोकसभा पराभव आणि फेरबदलाबाबत काहीही चर्चा झाली नसून, याबाबत चर्चा करण्यासाठी स्वतंत्र बैठक होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे अजूनही पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. पराभवाला पक्षातील काही पदाधिकारी जबाबदार असल्याचे त्यांचे मत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना, युवासेनेमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्याची मागणी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे लावून धरली आहे; परंतु फेरबदल करून काय साध्य होणार, विधानसभा निवडणुकीसाठी साम, दाम, दंड,भेद, अशी जबाबदारी घेणारी बी-टीम आहे काय? याबाबत पक्ष चाचपणी करीत आहे. तशी टीम सापडली तरच फेरबदल करण्यावर शिक्कामोर्तब होईल. शिवसेना नेते खैरे यांनी फेरबदलासाठी त्या पद्धतीनेच यादी तयार केल्याची चर्चा आहे. शहरप्रमुख, शहर उपप्रमुख, जिल्हा उपप्रमुखांतील फेरबदल स्थानिक पातळीवर होतील, तर जिल्हाप्रमुख बदलण्यासाठी मातोश्रीवर चिंतन बैठक होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे. जिल्हाप्रमुख पदासाठी तर पक्षातील अनेक हौशै-नवशे गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. 

शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्याशेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, त्याकडे लक्ष देण्याबाबत शुक्रवारच्या बैठकीत जिल्हाप्रमुखांना सूचित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांकडे जा, त्यांना पीक विमा, दुष्काळी अनुदानाबाबत काही अडचणी असतील, तर मार्गदर्शन केंद्र सुरू करा. गावागावांमध्ये केंद्र सुरू करण्याच्या सूचना जिल्हाप्रमुखांना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणूक पराभव अनुषंगाने आयोजित बैठक पुढे ढकलण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाChandrakant Khaireचंद्रकांत खैरेAurangabadऔरंगाबाद