सुभेदारी गेस्ट हाऊस नजीकच्या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुतळ्याजवळ हा मेळावा झाला. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, डॉ.पवन डोंगरे आदींनी मेळाव्यास मार्गदर्शन केले. विकलांग सेलचे शहराध्यक्ष मुदस्सर अन्सारी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. यावेळी काही विकलांगांना कुबड्यांचे वाटप करण्यात आले. मेळाव्यास सुरेखा पानकडे , सीमा थोरात, हमद चाऊस, भाऊसाहेब जगताप, जयप्रकाश नारनवरे, मोहित जाधव, कैसर बाबा, संजय वाघमारे आदींची उपस्थिती होती. शेख मुनीर,कलीम खान, शकील शेख, राजेश गायकवाड, लालसिंग, मारुती जाधव, संजय खुळे, शेख वसीम आदी विकलांग बांधवांनी मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
काँग्रेसच्या विकलांग सेलचा मेळावा
By | Updated: December 4, 2020 04:11 IST