शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

'प्रोजेक्टसह भेटा, फक्त चर्चा नको'; आता सरकारचे फक्त ९३५ दिवसच शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 15:22 IST

Now the central government has only 935 days left : आपण सर्वांनी मिळून काम केले तरच औरंगाबादसाठी ठोस काम करता येईल.

ठळक मुद्देहवामानाची अचूक माहिती मिळावी, यासाठी रडारसाठी पाठपुरावा करून ते मंजूर करून घेतले आहेआजवर पीएनजी गॅस आणि इंडियन ऑइल डेपो, चिकलठाणा येथे पीटलाइन मंजूर करून घेतली.

औरंगाबाद : फक्त मागण्या करण्याऐवजी त्या पूर्ण होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रोजेक्ट रिपोर्ट (प्रकल्प अहवाल) सादर करावा. जेणे करून पाठपुरावा करणे शक्य होईल. आता सरकारच्या हातात फक्त ९३५ दिवस शिल्लक आहेत,असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Bhagwat Karad ) यांनी रविवारी केले. ( 'Meet with the project, not just discuss'; Now the central government has only 935 days left )

जालनारोडवरील पंचतारांकित हॉटेलमध्ये शहरातील सर्व उद्योग संस्थांतर्फे आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. डॉ. कराड म्हणाले, आपण सर्वांनी मिळून काम केले तरच औरंगाबादसाठी ठोस काम करता येईल. आजवर पीएनजी गॅस आणि इंडियन ऑइल डेपो, चिकलठाणा येथे पीटलाइन मंजूर करून घेतली. औरंगाबाद ते पुणे रेल्वेचे सर्वेक्षण, मनमाड ते नांदेड रेल्वे विद्युतीकरण पाठपुरावा, विभागीय जेरियाट्रीक सेंटर, एम्स हॉस्पिटल, कन्व्हेन्शन सेंटर आणि मोठ्या आयटी पार्कसाठी मागणी केलेली आहे. त्यासह पायाभूत सुविधा, उद्योग, व्यापार, रेल्वे आणि इतर विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. इथून पुढे एक एक दिवस महत्त्वाचा आहे. त्यामुळे या प्रत्येक दिवसांत शहर आणि जिल्ह्याच्या पदरात योजना आणण्याची जबाबदारी माझ्यासह सर्वांची आहे.

आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष प्रीतिश चॅटर्जी, सीआयआयचे अध्यक्ष रमण आजगांवकर, सीएमआयएचे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू, मसीआचे अध्यक्ष नारायण पवार, जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष जगन्नाथ काळे, उद्योजक राम भोगले, मानसिंग पवार, ऋषी बागला, मुकुंद भोगले, रणजित कक्कड, रितेश मिश्रा, सुनील रायथठ्ठा, रवींद्र कोंडेकर, जसवंत सिंग राजपूत, रसदीपसिंग चावला, प्रशांत देशपांडे, आशिष गर्दे, रमेश नागपाल यांच्यासह मॅजिक, एआयएसए, एआयसीए, एमसीटीसी, क्रेडाई, सीएएमएआयटी, पर्यटन, औरंगाबाद गुड्स ट्रान्सपोर्ट, सराफा, कपडा व्यापारी आदींसह विविध संस्थाच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. प्रसाद कोकीळ यांनी सूत्रसंचालन केले. शिवप्रसाद जाजू यांनी आभार मानले.

'बुलेट ट्रेन' मार्गी लावण्यासह नांदेड-मनमाड दुहेरीकरणास प्राधान्य : रावसाहेब दानवे

रडारसाठी पाठपुरावा केलाहवामानाची अचूक माहिती मिळावी, यासाठी रडारसाठी पाठपुरावा करून ते मंजूर करून घेतले आहे, असे डॉ.कराड यांनी सांगितले. रडारमुळे शहरापासून राज्यातील ५०० किलोमीटर अंतरावर हवामानाचा अंदाज घेतला जाऊ शकतो. जी कामे असतील ती योग्य पद्धतीने अहवाल सादर करून करता येतील. मराठवाड्यासाठी रडार महत्त्वाचे का आहे, याबाबत लोकमतने वृत्तमालिका प्रकाशित करून पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

ऑरिकमध्ये आयटीपार्कसाठी पाठपुरावा करावाडॉ. कराड यांनी ऑरिक सिटीमध्ये दोन आयटी पार्क येण्यासाठी पाठपुरावा करावा. ऑरिकमध्ये ऑटोमोबाइल क्षेत्रातील अँकर प्रोजेक्ट आणावा, अशी मागणी आमदार सावे यांनी केली. आमदार बागडे म्हणाले, कराड यांनी जिल्ह्यातील उद्योग आणि व्यापाराला बळकटी द्यावी. चॅटर्जी म्हणाले, पुढील ३० वर्षांच्या विकासाच्या ब्लू प्रिंटमध्ये प्रामुख्याने उद्योग, पर्यटन, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि पर्यावरण घटकांवर भर देणे गरजेचे आहे.

डॉ. कराड यांच्याकडून अपेक्षाऑरिकचे जागतिक स्तरावर मार्केटिंग करून अँकर प्रोजेक्ट आणणे, बिडकीन येथील मेडिसिन पार्कचे काम सुरू करणे, डिफेन्स क्लस्टर कार्यान्वित करणे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग, स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्ट सुरू करणे, आयआयटी, एम्स हॉस्पिटल, रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण आणि मराठवाडा वॉटर ग्रीडचे काम पूर्ण करण्याच्या अपेक्षा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांच्याकडून असल्याचे आज चर्चासत्रात समोर आले.

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतAurangabadऔरंगाबादCentral Governmentकेंद्र सरकार