शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

औषधी महागणार? नवा स्टाॅक येताच होईल स्पष्ट

By संतोष हिरेमठ | Updated: April 3, 2024 17:43 IST

१५ दिवसांची प्रतीक्षा : जिल्ह्यातील रुग्णांना सध्यातरी दिलासा

छत्रपती संभाजीनगर : वार्षिक घाऊक किंमत निर्देशांकानुसार औषधांचे दर वाढवण्याची परवानगी सरकारने फार्मास्युटिकल कंपन्यांना दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ॲण्टिबायोटिक्सपासून ते पेनकिलरपर्यंत अशा औषधांसाठी आता अधिक पैसे खर्च करावे लागणार आहे. शहरात औषधींचा नवा स्टाॅक आल्यानंतरच कोणती औषधी महाग झाली, कोणती स्वस्त झाली, हे स्पष्ट होणार आहे.

घाऊक किंमत निर्देशांकामध्ये अनेक बदल केल्याने आता अनेक औषधांच्या किमती वाढणार आहेत. देशात ८००हून अधिक औषधे महाग होणार आहे. औषधींच्या किमती १२ टक्क्यांनी वाढणार असल्याचे सांगण्यात येते. परंतु कोणत्या औषधी किती महागल्या, हे काही दिवसांनंतर स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात येते.

ही औषधी महागण्याची शक्यतापॅरासिटामॉल, व्हिटॅमिन गोळ्या, स्टिरॉइड्स, पेनकिलर, टीबी, कॅन्सर, मलेरिया, एचआयव्ही- एड्स, ॲण्टिबायोटिक्स, ॲण्टि-डोट्स, ॲनिमिया, डिमेंशिया औषधे, बुरशीविरोधी औषधे, हृदयविकाराची औषधे, त्वचारोग संबंधित औषधे, प्लाझ्मा, जंतुनाशक औषधे इ. औषधी महागणार असल्याचे सांगण्यात येते.

ऐकण्यात आले; पण कंपन्यांकडून लेखी नाहीऔषधीच्या किमती वाढणार असल्याचे ऐकण्यात आले आहे. मात्र, कंपन्यांकडून अजून काही लेखी आलेले नाही. सध्या सर्दी, खोकल्याने आजारी पडल्यानंतर उपचारासाठी किमान एक हजार रुपये खर्च येतो. औषधींवरील ‘जीएसटी’ कमी करण्याची गरज आहे.- अनिल महाजन, युनिट सचिव, महाराष्ट्र सेल्स ॲण्ड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन

संघटनेपर्यंत काही माहिती नाहीऔषधांच्या किमती वाढीसंदर्भात अद्यापपर्यंत संघटनेला कोणतीही माहिती मिळालेली नाही. किमती वाढीसंदर्भात ई-मेलही आलेला नाही. त्यामुळे सध्या तरी औषधींच्या किमती वाढणार नाहीत.- नितीन देशमुख, अध्यक्ष, केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन

नवीन माल आल्यावर स्पष्ट होईलऔषधींचा नवीन माल येण्यास किमान १५ दिवस लागतील. त्यानंतरच किमती वाढल्या की नाही, हे स्पष्ट होईल. प्रत्येक औषधीच्या किमती वाढतातच, असे नाही. काही औषधींच्या किमती कमीही होतात.- विनोद लोहाडे, औषध विक्रेता

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmedicineऔषधं