शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दात्यांकडून औषधींचे दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 00:47 IST

रुग्णालय प्रशासनाने समाजातील दात्यांना औषधी दान करण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत सोमवारी पुष्कर भातांब्रेकर यांनी मुलगा हर्ष याच्या दुसºया वाढदिवसानिमित्त ३ बॉक्स रिंगर लॅक्टेट आणि डीएनएसचे ३ बॉक्स रुग्णांसाठी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दात्यांकडून होणाऱ्या अन्नदानामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना फायदा कमी; पण घाटी रुग्णालय प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. अन्नाची नासाडी होत असल्याने रुग्णालय प्रशासनाने समाजातील दात्यांना औषधी दान करण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत सोमवारी पुष्कर भातांब्रेकर यांनी मुलगा हर्ष याच्या दुसºया वाढदिवसानिमित्त ३ बॉक्स रिंगर लॅक्टेट आणि डीएनएसचे ३ बॉक्स रुग्णांसाठी दिले. इतर दाते व संस्थांनी यासाठी पुढे येण्याचे आवाहन घाटी रुग्णालय प्रशासनाने केले आहे.घाटीत संपूर्ण मराठवाड्यासह खान्देश व विदर्भाच्या काही भागांतील रुग्ण उपचारार्थ येतात. त्यांच्या समवेत त्यांचे नातेवाईकही सोबत येत असतात. त्यांची गैरसोय दूर व्हावी या उद्देशाने विविध स्वयंसेवी संस्था व संघटना अन्नदान करतात. मात्र, हे अन्नदान घाटी प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. काही रुग्णांचे नातेवाईक अन्न न खाता ते कचºयात टाकत असल्याचे प्रकार घडत आहेत. यातून कच-याची समस्या निर्माण होत असल्याचे आढळून आले आहे. काही दिवसांपूर्वी जवळपास १५ ट्रक अन्न रुग्णांच्या नातेवाईकांनी कच-याच्या डब्यात टाकल्याचे आढळून आले होते. अन्नाची नासाडी होऊ नये, तसेच अन्नदानावर होणाºया खर्चातून औषधी खरेदी करावी. गरजू आणि आर्थिक दुर्बल रुग्णांना ती पुरवावी. सलाईन, बँडेजसह इतर कमी खर्चाच्या औषधी रुग्णांना पुरविल्या जाऊ शकतात. यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन घाटी रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :medicinesऔषधंSocialसामाजिक