शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय प्रतिनिधी, शहर पोलीस अ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:49 IST

एमजीएमवर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीस अ संघाने जॉन्सन अँड जॉन्सन संघावर, वैद्यकीय प्रतिनिधी क संघाने युनायटेड संघावर आणि वैद्यकीय ब संघाने मध्यवर्ती कार्यशाळा संघावर मात केली. आज झालेल्या सामन्यात शेख मुकीम, इम्रान पटेल, शेख असीफ, नीरज शिमरे, अनिरुद्ध शास्त्री यांनी आपला विशेष ठसा उमटवला.

औरंगाबाद : एमजीएमवर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीस अ संघाने जॉन्सन अँड जॉन्सन संघावर, वैद्यकीय प्रतिनिधी क संघाने युनायटेड संघावर आणि वैद्यकीय ब संघाने मध्यवर्ती कार्यशाळा संघावर मात केली. आज झालेल्या सामन्यात शेख मुकीम, इम्रान पटेल, शेख असीफ, नीरज शिमरे, अनिरुद्ध शास्त्री यांनी आपला विशेष ठसा उमटवला.पहिल्या सामन्यात शहर पोलीस संघाने ३ बाद १९३ धावा केल्या. त्यांच्याकडून शेख मुकीमने ५३ चेंडूंत एक षटकार व ९ चौकारांसह नाबाद ८३ धावांची वादळी खेळी केली. शेख असीफने एक षटकार व आठ चौकारांसह ५३, सुदर्शन एखंडेने २0 धावा केल्या. जॉन्सन अँड जॉन्सन संघाकडून अनिरुद्ध पुजारी, हर्षद वैद्य व रणजित युके यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात जॉन्सन अँड जॅन्सन संघ ४ बाद १0१ धावाच करू शकला. त्यांच्याकडून हर्षद वैद्यने ३२ व हेमंत मिठावाला व विजय ढेकळे यांनी प्रत्येकी १६ धावा केल्या. शहर पोलीसकडून अनंत गायके, शेख जिलानी, शेख असीफ, शेख मुकीम यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.दुसऱ्या सामन्यात ‘वैद्यकीय प्रतिनिधी क’ने ६ बाद १६७ धावा केल्या. त्यांच्याकडून इम्रान पटेलने २ षटकार, ५ चौकारांसह नाबाद ५८, अब्दुल वाहीदने एक षटकार व ४ चौकारांसह ३४ व इकबाल खानने ५ चौकारांसह ३0 व अब्दुल कय्युमने २९ धावा केल्या. युनायटेड ब्रेव्हरीजकडून संदीप गायकवाड व संदीप नागरे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. पंकज फलकेने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात युनायटेड ब्रेव्हरीज ६ बाद १६१ करू शकला. त्यांच्याकडून नीरज शिमरे याने ५४ चेंडूंत ३ षटकार व ६ चौकारांसह ७४ धावांची झुंजार खेळी केली. भास्कर जिवरगने एक षटकार व ३ चौकारांसह ४२ व संदीप नागरेने १८ धावा केल्या. वैद्यकीय प्रतिनिधी क संघाकडून अब्दुल वाहीद, वैभव कोलते व जुबेर मुहमी यांनी प्रत्यकी २ गडी बाद केले.तिसºया सामन्यात वैद्यकीय प्रतिनिधी ब संघाने १९२ धावा केल्या. त्यांच्याकडून अनिरुद्ध शास्त्रीने ४४ चेंडूंत ११ चौकार व एका षटकारासह ७0, संकेत शर्माने २९ व सय्यद फिरदोजने २३ धावा केल्या. मध्यवर्ती कार्यशाळेकडून विकी देशपांडे, रोहिदास गुंजाळ, सोमीनाथ तळेकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात मध्यवर्ती कार्यशाळा संघ १४.४ षटकांत ६९ धावांत गारद झाला. वैद्यकीय प्रतिनिधी ब संघाकडून अनिरुद्ध शास्त्रीने ६ धावांत ३ गडी बाद केले. सय्यद फिरदोस व राहुल भालेराव यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.