शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीच्या नियुक्त्या ३० जुलैपर्यंत स्थगित, याचिकेवर सुनावणी ३० रोजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 07:09 IST

आरक्षित संवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून नियुक्तीस नकार देणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) धोरणास आव्हान देणा-या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ३० जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

 औरंगाबाद : आरक्षित संवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून नियुक्तीस नकार देणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) धोरणास आव्हान देणा-या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ३० जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे. परिणामी एमपीएससीने ३० तारखेपर्यंत नियुक्त्या न करण्याचे निवेदन गुरुवारी न्यायालयात केले. त्यामुळे आता एमपीएससीच्या नियुक्त्या स्थगित झाल्या आहेत.३० जुलै रोजी राज्याचे महाधिवक्ता काही प्रकरणांच्या सुनावणीसाठी औरंगाबाद खंडपीठात येणार आहेत. तोपर्यंत आयोग कोणत्याही पदावर कोणाचीही नियुक्ती करणार नाही, असे निवेदन औरंगाबाद खंडपीठातील मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी गुरुवारी याचिकेच्या सुनावणीच्या वेळी केले. नांदेड येथील याचिकाकर्ती चारुशीला चौधरी आणि इतर २७ मुलींनी लोकसेवा आयोगातर्फे महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्या विविध पदांकरिता खुल्या प्रवर्गातून अर्ज केले होते. हे परीक्षार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा खुल्या प्रवर्गातून उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुलाखतीसाठी बोलावले होते. त्यांच्या मुलाखतपत्रावर अशी अट टाकण्यात आली होती की, मुलाखतीला येताना सोबत शाळेचा दाखला आणणे अनिवार्य आहे. उमेदवार आरक्षित जातीचा असेल, तर त्यांना खुल्या प्रवर्गातून नियुक्ती देता येणार नाही, असे आयोगाचे म्हणणे होते. वस्तूत: याचिकाकर्त्यांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज केला असल्यामुळे आयोेगाने त्यांंना जातीची प्रमाणपत्रे मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उमेदवारांना मागास जातीचा लाभ जरी घ्यावयाचा नसला तरी केवळ ते आरक्षित जातीमध्ये जन्मल्यामुळे आयोगाने त्यांना जातीचे प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले. त्याविरुद्ध त्यांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात धाव घेतली. हे प्रकरण सध्या औरंगाबाद खंडपीठात आहे.दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे भरावयाच्या राज्यसेवेच्या विविध पदांकरिता खुल्या प्रवर्गातून अर्ज केलेल्या आरक्षित संवर्गातील जातीच्या उमेदवारांना समांतर आरक्षणाच्या पदावर नियुक्तीबाबत विचार करण्याचा अंतरिम आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. ए. एम. ढवळे यांनी बुधवारी ( ११ जुलै) झालेल्या सुनावणीच्या वेळी दिला आहे.चौकट- आरक्षण हे दोन प्रकारचे आहे. सामाजिक आरक्षण : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, भटके विमुक्त आदी. समांतर आरक्षण : महिला, माजी सैनिक, अपंग, धरणग्रस्त आदी. यापूर्वी समांतर आरक्षणामधून याचिकाकर्त्यांच्या नियुक्तीबाबत विचार करण्याचा अंतरिम आदेश खंडपीठाने दिलेला आहे. याचिकाकर्त्या परीक्षार्र्थींची खुल्या महिला प्रवर्गातून निवड झाली आहे.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा