लातूर : काँग्रेसचे महापौर दीपक सूळ आणि शिवसेनेचे लातूर जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी ऐन दिवाळीत एकमेकांच्या घरी दिवाळीचा फराळ भेट देत शासकीय विश्रामगृहात बंद दाराआड गुफ्तगू केले. त्यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा रंगली होती, याचा तपशील नाही. तासभर रंगलेल्या या भेटीत कसलीच राजकीेय चर्चा झाली नसल्याचा दावा महापौर सूळ यांनी केला आहे. मात्र या भेटीवर राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा सुरु आहेत. लातूर महापालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे. अॅड. दीपक सूळ हे महापौर पदाची कमान सांभाळीत आहेत. परंतु सत्ताधाऱ्यांइतकेच त्यांचे विरोधकांशीही जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ऐन दिवाळीत शिवसेनेचे लातूर जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी महापौर सूळ यांच्या घरी मिठाई पाठविली. यानंतर सावंत हे लातूर दौऱ्यावर आल्यावर शासकीय विश्रामगृहावर जाऊन महापौर सूळ यांनी दिवाळीची मिठाई भेट देऊन तासभर गुफ्तगू केले. महापालिकेच्या निवडणुकीची तारीख घोषित झाल्यानंतर महापौर विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांच्या संपर्कात येत असल्याने मात्र यावर चर्चा झडल्या जात आहेत. महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी एकदा सावंतांची भेट अॅड़ दीपक सूळ यांनी अशीच घेतली होती़ त्यावेळीही राजकीय वर्तुळात चर्चा झडली़ (प्रतिनिधी)
महापौर सूळ आणि सेनेचे सावंत यांच्यात बंद दाराआड गुफ्तगू !
By admin | Updated: November 4, 2016 00:02 IST