शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
4
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
5
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
6
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
7
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
8
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
9
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
10
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
11
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
12
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
13
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
14
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
15
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
16
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
17
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
18
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
19
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
20
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती

घाटी रुग्णालयाच्या भिंतींनाही फुटला मायेचा पाझर; अंधाला सोडून नातेवाईक गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 19:31 IST

Ghati Hospital of Auranagabad : आपल्याला कोणीच नाही, असे सांगत त्यांनी घरच्यांविषयी माहिती देण्याचे टाळले. 

ठळक मुद्देदर महिन्याला पाच-सहा ज्येष्ठांना सोडतात नातेवाईक काही दिवसांपूर्वीच बेवारस लोकांचे मनपाच्या मदतीने पुनर्वसन

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : स्थळ घाटीतील ग्रंथालयासमोरील रस्ता. अंध ज्येष्ठाला कोणीतरी घाटीत सोडून गेले. अंधत्वाने विद्रूप झालेले डोळे दिसू नयेत, म्हणून चेहऱ्यावर रुमाल बांधलेला. नातेवाईकांनी साथ सोडली, तरी आपल्याला कोणीच नाही म्हणून ‘तो’ त्यांचे नावही घेत नव्हता. हे दृश्य पाहून घाटीच्या कर्मचाऱ्यांनाच काय भिंतींनाही मायेचा पाझर फुटला.

घाटीत रस्त्याच्या कडेला उन्हात हा  ज्येष्ठ बसला होता. येणारे-जाणारे क्षणभर थांबत होते. काहींनी शंका म्हणून विचारणा केली, तेव्हा डोळे नसल्याने रूमाल बांधल्याचे त्या ज्येष्ठाने सांगितले. तरीही कोणाला विश्वास बसत नव्हता. शेवटी ‘त्या’ ज्येष्ठाने रूमाल हटविला आणि अंधत्वाचा पुरावाच दाखविला. हे दृश्य पाहणारे क्षणभर स्तब्धच झाले. परिचारिका संगीता सावंत यांनी ज्येष्ठाला रस्त्यावरून उचलून सावलीत बसविले. कोण आहे, कोणी सोडले, अशी त्यांच्याकडे विचारणा केली. मात्र, आपल्याला कोणीच नाही, असे सांगत त्यांनी घरच्यांविषयी माहिती देण्याचे टाळले. 

पुनर्वसनासाठी प्रयत्नवृद्धांची मुले, नातेवाईकच त्यांना घाटीत सोडून जात असल्याचे दिसून येत आहे.  दर महिन्याला किमान पाच-सहा अनोळखी लोकांना तरी घाटी परिसरात सोडून देण्यात येते. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे म्हणाले, काही दिवसांपूर्वीच बेवारस लोकांचे मनपाच्या मदतीने पुनर्वसन करण्यात आले होते. परंतु पुन्हा नवीन लोक घाटीत सोडण्यात आले आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठीही प्रयत्न केला जाईल.

आई-वडिलांनी केला सांभाळमाझे कोणी नाही, आई-वडील होते, तोपर्यंत त्यांनी माझा सांभाळ केला. ते वारल्यानंतर असेच जगत आहे, असे त्या अंधाने सांगितले. कुठे राहतो, हे सांगणेही त्यास कठीण झाले होते.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीAurangabadऔरंगाबाद