शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘मे हिट’ने बीडकर झाले घामाघूम

By admin | Updated: May 6, 2017 00:10 IST

बीड : एप्रिलपर्यंत चाळिशीच्या आसपास असलेला पारा मे उजाडताच दोन अंशांनी पुढे सरकला आहे. त्यामुळे बीडकर अक्षरश: घामाघूम झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : एप्रिलपर्यंत चाळिशीच्या आसपास असलेला पारा मे उजाडताच दोन अंशांनी पुढे सरकला आहे. त्यामुळे बीडकर अक्षरश: घामाघूम झाले आहेत. पोळणाऱ्या उन्हाचे चटके असह्य होत असून, दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढली आहे. शुक्रवारी ४३ अंश तापमानाची नोंद झाली. या उन्हाळ्यातील हे सर्वाधिक तापमान आहे.सकाळी सात वाजेपासूनच ऊन जाणवायला सुरुवात होते. दिवसभर त्याची तीव्रता कायम असते. सायंकाळी सहा-साडेसहा वाजेपर्यंत ही धग अशीच राहते. रणरणत्या उन्हात घराबाहेर पडणे मुश्किल बनत असून, या काळात जनजीवन ठप्प होऊन जाते. दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत आहेत. वाढत्या उन्हामुळे रसाळ फळांच्या खरेदीकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे.शिवाय, ज्यूस बार, रसवंती गजबजून गेल्या आहेत. बर्फालाही वाढती मागणी आहे. उलट्या, मळमळ, ताप, डोकेदुखी, अंगदुखी असे आजार वाढले आहेत. त्यामुळे शासकीय, तसेच खाजगी दवाखाने रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात ४१-४२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे पावसाची सर्व जण आतुरतेने वाट पाहत आहेत.उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे योग्य त्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपूर्ण महिनाभर उन्हाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उन्हापासून बचावासाठी गॉगल, गमछे, टोप्या वापरण्यावर नागरिकांचा भर असून, कुलर, ए.सी., पंख्यांचा आधार घेतला जात असल्याचे चित्र आहे.वऱ्हाडींची लाही-लाहीलग्नसराईही असल्यामुळे बसगाड्या खचाखच भरून जात आहेत. खाजगी वाहनांनाही पसंती आहे. लग्न समारंभासाठी उपस्थित राहणाऱ्या आबालवृद्धांचेही उन्हामुळे हाल होत आहेत. हजारो वऱ्हाडींसाठी थंड पाणी व सावलीची सोय करताना वधू पक्षाची तारांबळ उडताना दिसून येत आहे.