लातूर : ‘लोकमत’ च्या वतीने लातूरच्या टाऊन हॉल मैदानावर आयोजित एस्पायर एज्युकेशन फेअरला विद्यार्थी-पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हजारो विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट देऊन शैक्षणिक संधी जाणून घेत करिअरचा कानमंत्र घेतला. रविवारी सायंकाळी विद्यार्थी-पालकांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचा शानदार समारोप झाला. समारोपाच्या कार्यक्रमास मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, राजभोग आटाचे उद्योजक विजयकुमार केंद्रे, राजीव गांधी इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटेक्निकचे कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, युनिक अॅकॅडमीचे संचालक सुनील शेळगावकर, प्रकाश नागोराव, ‘लोकमत’चे शाखा उपव्यवस्थापक नितीन खोत यांची प्रमुख उपस्थिती होती. ६ ते ८ जून या कालावधीत टाऊन हॉल मैदानावर ‘लोकमत’च्या वतीने शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. या प्रदर्शनास विद्यार्थ्यांनी ‘न भूतो’ असा प्रतिसाद दिला. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या वेगळ्या वाटा जाणून घेत करिअरबाबत मार्गदर्शन मिळविले. तिन्ही दिवशी विविध विषयांतील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसोबतच पालकांनीही प्रदर्शनास भेट देऊन पाल्यांच्या करिअरविषयी जागरुकता दर्शविली. या प्रदर्शनात कॉलेज आॅफ अॅग्री कल्चर बिझनेस मॅनेजमेंट लातूर, राजीव गांधी इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटेक्निक हासेगाव, सृजण इन्स्टिट्यूट आॅफ गेमिंग अॅण्ड अॅनिमेशन पुणे, सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट पुणे, संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी कोपरगाव, डी.बी. ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्स लातूर, सिंहगड इन्स्टिट्यूट पुणे, एमडीए इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटेक्निक कोळपा, सुमन संस्कार प्रेप स्कूल लातूर, द युनिक अॅकॅडमी पुणे, स्टेट बँक आॅफ इंडिया लातूर, ढोले-पाटील कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग पुणे, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे, एन.बी.एस. इन्स्टिट्यूट औसा, त्रिपुरा ज्युनिअर सायन्स कॉलेज लातूर, चन्नबसवेश्वर कॉलेज लातूर, विलासराव देशमुख फाऊंडेशन लातूर, जामिया इन्स्टिट्यूट अकलकुआ, एमआयटी विश्वशांती गुरुकुल पंढरपूर, द व्हर्टेक्स अॅकॅडमी लातूर, ज्ञानसागर इन्स्टिट्यूट पुणे, नॅशनल स्कूल आॅफ बँकिंग लातूर, इन्स्टिट्यूट आॅफ डेन्टल मेकॅनिक्स औरंगाबाद, एसएसटी फॅशन डिझाईन कॉलेज लातूर, भीमण्णा खंड्रे इन्स्टिट्यूट भालकी, एमईएस कॉलेज आॅफ आॅप्टोमेट्री पुणे, एकलव्य हॉस्टेल लातूर, एनआयएफई इन्स्टिट्यूट यांनी सहभाग घेतला. त्यांना मानचिन्हाने गौरविण्यात आले. दरम्यान, रविवारी काढण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये साक्षी कांबळे, वर्षाराणी डोंगरे, लक्ष्मीकांत सोलेगावकर, बी.बी. देवळे, विक्रम मोटे, रविकांत पाटील यांनी चांदीचे नाणे पटकाविले. त्यांचाही नाणे देऊन कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. (प्रतिनिधी)विद्यार्थी, पालकांची चिंता दूर करणारा उपक्रम : आयुक्त ‘लोकमत’ने या प्रदर्शनाच्या माध्यमातून शैक्षणिक संधी एकाच छताखाली उपलब्ध करून देत पालक व विद्यार्थ्यांची चिंता दूर केली आहे. निकालानंतर विद्यार्थी, पालक कोणत्या संस्थेत प्रवेश घ्यावा, याविषयी संभ्रमित असतात. तो संभ्रम प्रदर्शनाने दूर झाला आहे. पुढील वर्षी देश-विदेशातील महाविद्यालये, विद्यापीठ ‘लोकमत’च्या उपक्रमात सहभागी झाल्यास नवल वाटू नये, असे कौतुकोद्गार मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी समारोपप्रसंगी काढले. यावेळी विजयकुमार केंद्रे, शिवलिंग जेवळे या प्रमुख पाहुण्यांनीही मनोगत व्यक्त केले.
एज्युकेशन फेअरने दिला करिअरचा गुरुमंत्र
By admin | Updated: June 9, 2014 00:08 IST