शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या स्पा’ मध्ये अनेकांनी केली मसाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:16 IST

प्रोझोन मॉलमधील अनंतरा आणि दी स्ट्रेस हब या दोन्ही स्पामध्ये रोज सरासरी ५० ते ६० जण मसाज करण्यासाठी जात होते. या ग्राहकांकडून स्पाच्या मालकाला मिळणारा गल्ला आठ ते दहा लाखांच्या घरात असे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : प्रोझोन मॉलमधील अनंतरा आणि दी स्ट्रेस हब या दोन्ही स्पामध्ये रोज सरासरी ५० ते ६० जण मसाज करण्यासाठी जात होते. या ग्राहकांकडून स्पाच्या मालकाला मिळणारा गल्ला आठ ते दहा लाखांच्या घरात असे. विशेष म्हणजे स्पामध्ये मसाज करणाºया मुली बदलून आल्या की, ग्राहकांना माहिती कळविली जात असे.प्रोझोनमधील अनंतरा आणि दी स्ट्रेस हब या दोन स्पामध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाºया आंतरराष्ट्रीय सेक्स रॅके टचा गुरुवारी पोलीसांनी पर्दाफाश केला. तेथे काम करण्यासाठी आणण्यात आलेल्या थायलंडमधील ९ मुलींची पोलिसांनी मुक्तता केली.३ ग्राहक आणि व्यवस्थापक आणि अन्य कर्मचारी सध्या पोलीस कोठडीत आहेत. तेथे काम करीत असलेल्या स्थानिक दोन मुली दीड महिन्यापूर्वीच रुजू झाल्या होत्या. त्यांना आत काय चालते, याबाबत कोणतीही माहिती नव्हती, असे त्यांचे म्हणणे आहे. विदेशी मुली कशा आल्या याविषयी व्यवस्थापक शशांक खन्ना हा पोलिसांना उडवाउडवीची माहिती देत आहे.आंतरराष्ट्रीय दलालांमार्फत मुली यायच्या भारतातजगभरात सेक्स रॅकेटचा व्यवसाय जोमात आहे. या रॅकेटमध्ये काम करणारे दलाल विविध देशांतील विविध शहरांत आहेत. ते मागणीनुसार मुली उपलब्ध करीत असतात. औरंगाबादेतील स्पामध्ये ९ थाई मुलींही त्यांच्यामार्फतच आल्या असाव्यात असा पोलिसांना संशय आहे. टुरिस्ट व्हिसा घेऊन त्या भारतात आल्याने त्यांच्यावर कोणताही संशय पोलिसांना येत नाही. विशेषत: डिसेंबर महिन्यात ख्रिसमसनिमित्त विदेशी पर्यटक भारतात अधिक येतात. गोवा, मुंबई, दिल्ली, बेंगलोरसह प्रमुख शहरांत त्या जातात. मात्र यातील काही पर्यटक केवळ सेक्स रॅकेटचाच भाग असतात.