शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत उद्या राष्ट्रगीताचे सामुहिक गायन; शहरात तब्बल १५ हजार विद्यार्थी होणार सहभागी

By विजय सरवदे | Updated: August 8, 2022 18:47 IST

मंगळवारी ९ ऑगस्ट हा क्रांतीदिन असून हा दिवस ‘स्वराज्य महोत्सव’ म्हणून साजरा केला जाणार आहे.

औरंगाबाद : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी ‘स्वराज्य महोत्सव’ उत्स्फूर्तपणे साजरा केला जाणार आहे. या महोत्सवांतर्गत सकाळी ११ वाजता संपूर्ण जिल्ह्यात एकाचवेळी सामुहिक राष्ट्रगीत गायनाचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलात तब्बल १५ हजार विद्यार्थी सामुहिक राष्ट्रगीत म्हणतील, ग्रामीण भागात नागरिक, शाळा, शासकीय कार्यालयांमध्येही सामुहिक राष्ट्रगीताचा हा उपक्रम होणार आहे.

यासंदर्भात जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी सांगितले की, मंगळवारी ९ ऑगस्ट हा क्रांतीदिन असून हा दिवस ‘स्वराज्य महोत्सव’ म्हणून साजरा केला जाणार आहे. विभागीय क्रीडा संकुलात सकाळी ९ ते १० यावेळत १५ हजार शालेय विद्यार्थी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील व राष्ट्रगीताचे सामुहिक गायन करतील. त्यानंतर ११ वाजता जिल्हा परिषदेत सामुहिक राष्ट्रगीत गायन केले जाईल. काही जि.प. शाळांचे विद्यार्थी, जि.प.चे अधिकारी, कर्मचारी विविध वेशभुषेत या उपक्रमात सहभागी होतील. ग्रामीण भागातही शाळा, ग्रामपंचायत, विविध शासकीय कार्यालये व नागरिकांनाही समुहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात सहभागी होतील.

‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविला जाणार आहे. या कालावधीत घरे व शासकीय कार्यालयांवर तिरंगा ध्वज फडकाविला जाणार आहे. प्रत्येकाने देशाभिमान बाळगून आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा. यासाठी नागरिकांना तिरंगा ध्वज सहज उपलब्ध व्हावा म्हणून तो शाळा, अंगणवाडी, रेशन दुकानामार्फत विक्री केला जात आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत सुमारे सव्वादोन लाख ध्वज विक्री झाल्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी गटणे यांनी सांगितले.

जि.प. मुख्यालयात साफसफाईउपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांच्या देखरेखीखाली सोमवारी दुपारपासून जि.प. मुख्यालयातील प्रांगणात साफसफाई केली जात होती. उद्या सर्व अधिकारी, कर्मचारी, पाच-दहा जि.प. शाळांचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील. याशिवाय प्रायोगिकस्तरावर पाच- दहा बचत गटांचे स्टॉलही लावले जाणार आहेत. अधिकारी- कर्मचारी विविध वेशभुषेत या उपक्रमात सहभागी होणार आहेत. जि.प. मुख्यालयातील हा उपक्रम ११ वाजता सुरू होईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादIndependence Dayस्वातंत्र्य दिन