शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मसिआ, स्कोडा संघ उपांत्य फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 01:21 IST

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक करंडक आंतर औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत स्कोडा संघाने लिप फास्टनर संघावर मात करीत उपांत्य फेरी गाठली.

ठळक मुद्देव्हेरॉक करंडक : संदीप खोसरे, रोहन राठोड सामनावीर

औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक करंडक आंतर औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत स्कोडा संघाने लिप फास्टनर संघावर मात करीत उपांत्य फेरी गाठली. अन्य लढतीत मसिआने एनएचके संघावर ५ धावांनी मात करीत सेमीफायनलमधील प्रवेश निश्चित केला. अष्टपैलू कामगिरी करणारे संदीप खोसरे व रोहन राठोड हे सामनावीर ठरले.लिप फास्टनरने प्रथम फलंदाजी करताना २0 षटकांत ७ बाद ९0 धावा केल्या. त्यांच्याकडून राहुल पाटीलने ४ चौकारांसह ३१, राजू मदनने १६ व इंद्रजित उढाणने १३ धावा केल्या. स्कोडा संघाकडून विजय मेहेत्रे, संदीप खोसरे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. योगेश भागवत व मंगेश गरड यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात स्कोडा संघाने विजयी लक्ष्य १५.२ षटकांत ३ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून संदीप खोसरेने ४१ चेंडूंत ५ चौकारांसह नाबाद ४९, संदीप राठोडने १३ धावा केल्या.दुसºया सामन्यात मसिआ संघाने २0 षटकांत ६ बाद ११४ धावा केल्या. त्यांच्याकडून रोहन राठोडने २३ चेंडूंत १ षटकार व ३ चौकारांसह नाबाद ३३ धावा केल्या. रोहन मोरे व हितेश पटेल यांनी प्रत्येकी २२ व राहुल शर्माने १४ धावा केल्या. एनएचकेकडून कैलास हजारे व गौरव शिंदे यांनी प्रत्येकी २, तर रोहन हंडीबाग व फरहान नेहरी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात एनएचके संघ ९ बाद १0९ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून गौरव शिंदेने ३७ चेंडूंत २ चौकार, २ षटकारांसह ४२ व डी. वैद्य याने ३ चौकारांसह ३१ धावा केल्या. रोहन हंडीबाग १२ धावांवर नाबाद राहिला. मसिआकडून रोहन राठोड, रोहन मोरे व हितेश पटेल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.उद्या सकाळी ८.३0 वाजता शहर पोलीस विरुद्ध एमआर इलेव्हन आणि दुपारी १२.३0 वाजता एमएसईडीसीए वि. ग्रामीण पोलीस यांच्यात उपांत्यपूर्वफेरीचे सामने रंगणार असल्याचे स्पर्धा सचिव राहुल टेकाळे यांनी कळवले आहे.