शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियानात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
5
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
6
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
7
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
8
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
9
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
10
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
11
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
12
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
13
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
14
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
15
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
16
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
17
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
18
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
19
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
20
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

भरदिवसा लुटणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:22 IST

बँकेतून पैसे घेऊन जाणाºया व्यक्तींवर पाळत ठेवायची. त्यांचा पाठलाग करून संधी मिळताच डोळ्यात मिरचीपूड टाकून रोख रक्कम लुटायची, अशा प्रकारचे गुन्हे करणाºया टोळीतील पाच संशयितांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बँकेतून पैसे घेऊन जाणाºया व्यक्तींवर पाळत ठेवायची. त्यांचा पाठलाग करून संधी मिळताच डोळ्यात मिरचीपूड टाकून रोख रक्कम लुटायची, अशा प्रकारचे गुन्हे करणाºया टोळीतील पाच संशयितांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. चौकशीत त्यांनी जालना, पाटोदा व पैठण, गेवराई, अहमदनगर येथे लुटमार केल्याची कबुली दिली आहे.याबाबत पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. अंबड तालुक्यातील पाथरवाला येथील कल्याण पवार व त्यांचा मुलगा संजय यांनी रजिस्ट्रीच्या कामानिमित्त बँकेतून पैसे काढले. सदर रक्कम घेवून ते दुचाकीवरून अंबडकडे निघाले होते. दरम्यान, दुचाकीस्वार चौघांनी त्यांचा पाठलाग करून ढाकलगाव शिवारात त्यांना अडविले. डोळ्यात मिरचीपूड टाकून २ लाख ५३ हजार रुपये घेवून ते फरार झाले होते. यासंदर्भात २५ जुलै रोजी गोंदी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने घटना घडल्यापासून लुटमार करणाºया संशयितांचा शोध सुरू केला. सुरेश मुरलीधर जाधव (बोधेगाव,ता.शेवगाव,जि.नगर) हा टोळी तयार करून अशा प्रकारचे गुन्हे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तद्नंतर पोलिसांनी सुरेश जाधव याच्यावर पाळत ठेऊन त्यास ताब्यात घेतले.त्याच्याकडून माहिती घेत त्याचे साथीदार सिद्धीकी शामद शेख (२१, पिंगेवाडी, शेवगांव), उमेश बंडू कायस्थ (२१), लक्ष्मण शिवनाथ तोतरे, (२५), योगेश विष्णू गिरी (२२, सर्व रा. बोधेगाव, ता. शेवगाव,जि.नगर) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे व मुंबई येथून ताब्यात घेतले. संशयितांनी चौकशीत ढाकलगाव येथील गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या वाट्याला आलेले रोख ८० हजार रुपये काढून दिले. गुन्ह्यात वापरलेल्या ९० हजारांच्या दोन दुचाकी, चार मोबाईल, चाकू, नोटांच्या बंडलांसाठी वापरले जाणारे रॅपर, असा एकूण १ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. टोळीतील एका फरार सदस्याचा पोलीस शोध घेत आहेत.संशयितांना गोंदी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक चैनसिंग गुसिंगे, कैलास कुरेवाड, भालचंद्र गिरी, विष्णू चव्हाण, संजय मगरे, प्रशांत देशमुख, रामेश्वर बघाटे, वैभव खोकले रंजित वैराळ यांनी ही कारवाई केली.