शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसराईत सेलिब्रिटींच्या फेट्यांची नवरदेवांमध्ये क्रेझ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 15:52 IST

या सेलिब्रिटी फेट्यांची लोकप्रियता लक्षात घेता व्यापारीही हुबेहूब तसेच फेटे बांधून देत आहेत. 

ठळक मुद्देरणवीर, विराट, शाहिदच्या नावाने फेटे लोकप्रिय आता नवरदेव सोबत वऱ्हाडीही फेटे बांधत आहेत.

औरंगाबाद : रणवीरसिंह, विराट कोहली, शाहिद कपूर, आनंद आहुजा यांनी त्यांच्या लग्नात घातलेल्या खास डिझायनर फेट्यांची क्रेझ यंदाच्या लग्नसराईत पाहण्यास मिळत आहे. या सेलिब्रिटींच्या नावानेच इतर नवरदेव व्यापाऱ्यांकडे फेटे मागत आहेत. या सेलिब्रिटी फेट्यांची लोकप्रियता लक्षात घेता व्यापारीही हुबेहूब तसेच फेटे बांधून देत आहेत. 

फेटा बांधल्याशिवाय नवरदेवाचा पोशाख पूर्ण होतच नाही... फेटा बांधलेल्या नवरदेवाचा रुबाब काही औरच दिसतो. आता नवरदेव सोबत वऱ्हाडीही फेटे बांधत आहेत. आजही कोल्हापुरी फेटा पूर्वीइतकाच लोकप्रिय आहे. आता सेलिब्रिटींच्या लग्नामुळे आता फेटे डिझायनरही निर्माण झाले आहेत. परिणामी, फेट्यांमध्येही विविधता आली आहे. क्रिकेटर विराट कोहली याने लग्नात अबोली रंगाचा जोधपुरी पॅर्टनचा फेटा घातला होता. अभिनेता रितेश देशमुख याने घातलेला लाल रंगाचा व सोनेरी चेक्स असलेला बनारसी फेटा, आनंद आहुजा यांनी फिकट गुलाबी रंगाचा तर रणवीरसिंह यांनी हरियाणी पद्धतीचा फेटा परिधान केला होता. तसेच शाहिद कपूर याने पद्मावती चित्रपटात राजस्थानी पद्धतीचा घातलेल्या फेट्याची फॅशन यंदाच्या लग्नसराईत पाहण्यास मिळत आहे. 

फेट्यांची क्रेझ लक्षात घेऊन शहरातील डिझायनर्सने सेलिब्रिटी फेटे बनविणे सुरू केले आहे. पूर्वी गडद रंगाच्या कपड्यांच्या फेट्यांना मागणी असे. आता फिकट गुलाबी, फिकट अबोली, फिकट सोनेरी रंगाला अधिक पसंत केले जात आहे. नवरदेवाच्या पोशाखाला मॅचिंग असे फेटे असतात. फेटा घातल्यावर फोटोमध्ये रिचनेस दिसून यावा, याकडे जास्त लक्ष असते. ७० टक्के नवरदेव हे सेलिब्रिटी फेटे खरेदी करीत आहेत किंवा भाड्याने घेत आहेत. एकदम ‘रांगडा’ लूकसाठी कोल्हापुरी स्टाईलच्या फेट्यांना पसंती दिली जाते. साधारणत: लग्नाच्या १० दिवस अगोदर फेटा पसंत केला जातो. पूर्वी तयार फेटे जास्त विकत. आता पसंत पडलेल्या कापडाचा फेटा बांधून घेतला जात आहे. त्यास टिच करण्यात येते. यामुळे तो व्यवस्थित बसतो, असे डिझायनरने सांगितले. 

रितेशच्या मुंडावळ्या मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या लग्नात खास डिझाईनची मुंडावळी बांधली होती. ती मुंडावळी आता रितेश मुंडावळी नावाने लोकप्रिय झाली आहे. या लोकप्रियतेला हेरून डिझायनर्सने तशाच प्रकारच्या मुंडावळी तयार करून त्या बाजारात आणल्या आहेत.