गेवराई : विहिरीतून पाणी काढताना एका विवाहितेचा तोल गेल्याने पाण्यात बुडून तीचा मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील चकलंबा नजीक असलेल्या बालानाईक तांड्याजवळ गुरुवारी घडली.वनिता सचिन पवार (वय २२) असे त्या मयत महिलेचे नाव आहे. गुरुवारी त्या सकाळी ११ च्या सुमारास तांड्यापासून जवळ असलेल्या एका विहिरीवर पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. पाणी शेंदत असताना त्यांचा तोल गेला व त्या पाण्यात पडल्या. त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. वनिता पवार यांना दोन मुले आहेत. एक मुलगा तीन महिन्यांचा आहे. दरम्यान, तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. पाणीटंचाईचा हा बळी असल्याचे हे जिवंत उदाहरण आहे. चकलंबा ठाण्यात आकस्मात नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. तपास पो.कॉ. टी.एन. लांडगे करीत आहेत. (वार्ताहर)चकलांबा येथे राबविण्यात आलेली पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरली आहे.४लाखो रूपये खर्चून योजनेचे पाणी गावकऱ्यांना मिळत नाही.४गावात आजघडीला तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.४बालानाईक तांडा येथे मात्र टँकरने देखील पाणीपुरवठा होत नाही.४त्यामुळे तांड्यावरील रहिवाशांचे पाण्यावाचून हाल आहेत.४पाण्याअभावी विवाहितेला प्राणास मुकावे लागले.
विहिरीत पडल्याने विवाहितेचा मृत्यू
By admin | Updated: May 22, 2015 00:35 IST