नांदेड : नवदुर्गेच्या शृंगारासाठी शहरातील बाजारपेठही नववधूप्रमाणे सजली आहे़ विविध प्रकारचे साहित्य खरेदीला मंडळांकडून प्रारंभ झाला असून येत्या दोन दिवसांत आणखी वर्दळ वाढणार असल्याचा अंदाज साहित्य विक्रेत्यांनी व्यक्त केला़नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये शहरातील विविध ठिकाणी दांडिया-गरबाचे आयोजन करण्यात येते़ त्याकरिता लाहन बालक, युवक-युवती व महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होतात़ गरबा कार्यक्रमासाठी बाजारपेठेत साजशृंगाराच्या वस्तू उपलब्ध आहेत़विविध प्रकारच्या साहित्याला मागणीघागरा ओढणी, आकर्षक ड्रेसेस, साड्या, दागदागिने, कवडीमेटल सेट, ज्वेलरी साज, लहान मुलांकरिता रेडिमेट धोती, सोहळे, राजस्थानी व गुजराथी ड्रेस, टिपऱ्या, लटकन असे विविध साहित्य बाजारपेठेत उपलब्ध आहे़ खरेदीसाठी महिलांसह लहान मुलांची उत्सुकता वाढत असल्याचे एकंदरीत दिसून येते़ सजावटीच्या साहित्याचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत़महिलांची गर्दी वाढतेयमूर्तीचे विविध प्रकारचे हार, मुकुट, फेटे, दागदागिने, मंदिर, तोरणे, झालर, लटकन, आकर्षक झुंबर अशा विविध प्रकारचे साहित्य खरेदीकरिता बाजारपेठेत महिलांची गर्दी वाढत आहे़ त्यामुळे शहरातील मुख्य चौकात वर्दळ दिसून येत आहे़ सजावटीच स्टॉल लागले असल्याने वजीराबाद, जुना मोंढा, सिडको परिसरात गर्दी होऊ लागली आहे़विविध प्रतिष्ठांनामध्ये देवीचे आभूषण व गरबाच्या कार्यक्रमासाठी साहित्य खरेदीची धूम भाविकांमध्ये पहायला मिळत आहे़ निवडणुकीच्या धामधुमीत नवरात्र महोत्सवालाही वेगळा रंग चढणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़ देवी बसविण्यासाठी तयार करण्यात येत असलेले पंडाल बांधणी व सजावटीसाठी कारागिर अंतिम टप्प्याचे काम करत आहेत़ शहरातील शिवाजीनगर, वजिराबाद, नवा मोंढा, पावडेवाडी नाका, बाबानगर, आनंदनगर परिसरात दुर्गा मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते़ (प्रतिनिधी)
नवरात्रोत्सवासाठी बाजारपेठ सजली
By admin | Updated: September 24, 2014 00:17 IST