शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
3
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
4
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
5
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
6
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
7
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
8
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
9
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
10
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
11
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
12
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
13
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
14
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
15
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
16
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
17
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
18
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
19
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
20
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!

खरेदीसाठी बाजारात गर्दी

By admin | Updated: December 25, 2015 00:05 IST

ख्रि समसनिमित्त बाजारात विविध साहित्य खरेदीसाठी ख्रिश्चन बांधवांनी गर्दी केली होती.

ख्रि समसनिमित्त बाजारात विविध साहित्य खरेदीसाठी ख्रिश्चन बांधवांनी गर्दी केली होती. कोणी केक खरेदी करीत होते तर कोणी ख्रिसमस ट्री, घंटी इ. साहित्य खरेदी करत होते. काही जण रेडिमेड फराळाचे विविध प्रकार खरेदी करताना दिसून आले. शहरातील औरंगपुरा, गुलमंडी, मछली खडक, कुंभारवाडा, टिळक पथ, निराला बाजार, उस्मानपुरा, छावणी इ. भागांत खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. नाताळासाठी बाजारही मागील १० दिवसांपासून सजला होता. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक दुकानदारांनी दर्शनी भागात विविध साहित्य आकर्षकरीत्या मांडणी करून ठेवले होते. सांताक्लॉजचे मुखवटे व संपूर्ण पोशाखाचे शहरात व शहराबाहेरील महामार्गाच्या कडेला भरपूर स्टॉल लागले आहेत. यंदा सांताक्लॉजच्या मुखवट्यांची विक्री चांगली झाल्याची माहिती मोहंमदभाई या विक्रेत्याने दिली.शहरातील डेकोरेशनच्या दुकानात आॅप्टिक फायबरमधील ख्रिसमस ट्री विक्रीला आले आहेत. तसेच फायबर नसलेले ख्रिसमस ट्री सुद्धा विक्री होत आहेत. ३ फुटांपासून ते ५ फुटांपर्यंतचे ट्री विकले जात आहेत. विक्रेता संतोष जाधव याने सांगितले की, १० दिवसांपासून आकाशकंदिल व चिनी बनावटीच्या लाईटिंगची जास्त विक्री होत आहे. मछली खडक परिसरातील विक्रेते म्हणाले की, घंटी, बॉल्स, काचेचे एंजल्स, थर्माकोल प्रॉडक्टस्, स्टार्स, फुले अशा विविध वस्तूंची खरेदीही जोमात सुरू आहे. याशिवाय येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावाही अनेक दुकानात खास विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. लहान-मोठ्या आकारातील या रेडिमेड देखाव्यांना प्रत्येक ग्राहक आवर्जून खरेदी करीत आहे. याशिवाय बेकरीच्या दुकानात ड्रायफ्रूटस् रम, मेवामिश्रित केक खरेदीसाठीही गर्दी दिसून आली. यात रम केक, खजूर आणि अक्रोडच्या कुकीज, हनी बनाना ब्रेड, पोटॅटो ब्रेड, पायनापल पेस्ट्री, कॉर्न नानकटाई इ.ची खरेदीही जोमात होताना दिसून आली. शाळांमधूनही यंदा मोठ्या प्रमाणात केक व पेस्ट्रीच्या आॅर्डर मिळाल्याचे केक विक्रेत्यांनी सांगितले. शुभेच्छापत्रांचे विक्रेता सुहास देशपांडे यांनी सांगितले, की, ई-मेल, व्हॉटस अ‍ॅप, फेसबुकच्या जमान्यातही सध्या ख्रिसमससाठीच्या इंग्रजी शुभेच्छापत्रांना चांगली मागणी होती.