वासडी : कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत तीन पॅनल समोरासमोर उभे आहेत. ग्रामपंचायत सदस्य व सोसायटी संचालकांना मतदान करण्याचा अधिकार असल्याने सगळेच नेते ग्रामीण भागात प्रचाराला येत असल्याने प्रचारात रंग येत आहे.या निवडणुकीमुळे कधी आपल्याला राम राम न करणारे नेते आपली किती जुनी ओळख आहे, हे मतदारांना दाखवत आहेत. तर मतदारसुद्धा आम्ही तुमचेच म्हणून त्यांना चहापाणी करून पाठवत असल्याचे चित्र गावागावात पाहावयास मिळत आहे.कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान आहे. यानिवडणुकीत काँग्रेस व शिवसेना, राष्ट्रवादी काँगे्रस व भाजपा एका व्यासपीठावर आले आहेत. तर आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने वेगळी आघाडी उभी केली आहे. यामुळे इतर निवडणुकीत विरोधक असणारे नेते एका व्यासपीठावर आले. पण कार्यकर्ते संभ्रमात आहेत. तर ग्रामपंचायत व सोसायटी सदस्य आपण कुणालाच नाराज करायचे नाही अशी भूमिका घेत, कुणीही या आम्ही तुमचेच असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे निवडीणुकीचा फड चांगलाच रंगताना दिसत आहे.
बाजार समिती प्रचाराचा फड ग्रामीण भागात रंगतोय !
By admin | Updated: October 29, 2016 00:59 IST