शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील पहिली तान्हुल्यांसाठी आईच्या दुधाची बँक छत्रपती संभाजीनगरात

By संतोष हिरेमठ | Updated: June 1, 2023 12:20 IST

नवजात शिशूंना मिळणार आईच्या दुधाची शक्ती, महिनाभरात कार्यान्वित

छत्रपती संभाजीनगर : आईचे दूध म्हणजे नवजात शिशूसाठी अमृतच मानले जाते. मात्र, दुर्दैवाने अनेक शिशूंना अनेक कारणांमुळे आईचे दूध मिळत नाही. परंतु अशा शिशूंना मानवी दूध बँकेद्वारे आईचे दूध मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातील पहिली मानवी दूध बँक साकारण्यात आली असून, महिनाभरात ती कार्यान्वित होणार आहे.

छत्रपती संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) ही मानवी दुधाची बँक सुरू करण्यात येणार आहे. दरवर्षी १ जून रोजी संपूर्ण जगभरात दूध दिवस साजरा केला जातो. मानवी शरीराला दुधाची असलेली गरज आणि त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठीच जागतिक दूध दिन साजरा केला जातो. जन्मानंतर नवजात शिशूला आईचे दूध दिले जाते. जन्मानंतर सुरुवातीचे किमान सहा महिने बाळाला आईचे दूधच दिले जाते. घाटी रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात दरवर्षी ३ हजार ते ३५०० अत्यवस्थ नवजात बालकांवर उपचार केले जातात. प्रसूतिशास्त्र विभागात दररोज ६०-७० प्रसूती होतात. त्यातील दररोज १० ते १२ नवजात शिशू या विभागात दाखल होत असतात. प्रसूतीनंतर अनेक मातांना पुरेसे दूध येत नाही, काहींना उपचारामुळे शिशूंना दूध पाजता येत नाही. अशावेळी शिशूला गायीचे अथवा पावडरचे दूध पाजण्याची वेळ ओढवते. परंतु शिशूंना आईचेच दूध मिळावे, यादृष्टीने ‘हृमन मिल्क बँक’ साकारण्यात आली. यात आईचे दूध संकलित करून त्यावर आवश्यक ती प्रक्रिया करून ते गरजू शिशूंना दिले जाणार आहे.

दुधाचे महत्त्व अन् फायदे...दूध हा शरीरासाठी एक आवश्यक आणि पौष्टिक घटक मानला जातो. दूध प्यायल्यामुळे शरीराला तातडीने ऊर्जा मिळते. दूध हा शरीरासाठी आवश्यक सर्व पोषणतत्त्वांचा अतिशय चांगला स्रोत आहे. यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस, आयोडीन, आयर्न, पोटॅशियम, फोलेट्स, जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ड, उत्तम फॅट इ. चा समावेश असतो.

दूध म्हणजे अमृत, पहिली लसबाळाच्या जन्मानंतर आईला येणारे पहिल्या तीन दिवसांतील दूध हे बाळासाठी अमृत मानले जाते. पहिली लसही मानली जाते. हे दूध देऊ नये, असा अनेकांचा गैरसमज आहे. महिनाभरात मानवी दूध बँक म्हणझे लॅक्टेशन मॅनेजमेंट युनिट सुरु होईल. यासाठी रोटरी क्लबचे सहकार्य मिळाले.- डाॅ. एल. एस. देशमुख, नवजात शिशू विभागप्रमुख, घाटी

टॅग्स :milkदूधAurangabadऔरंगाबाद