शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा साहित्य परिषदेचे ग्रंथ पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 20:07 IST

पोस्टाने घरपोच पाठविणार सन्मानचिन्ह व रकमेचे धनादेश

ठळक मुद्दे२०२० या वर्षासाठी पुरस्कार 

औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने २०२० च्या ग्रंथ पुरस्कारांची घोषणा गुरुवारी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केली. डॉ. देवकर्ण मदन, डॉ. बाळू दुगडूमवार, मनोज बोरगावकर, चंद्रकांत वानखेडे, संदीप जगदाळे, सोपान हाळमकर, जगदीश कदम, सुनीताराजे पवार आदींना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यंदा कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सन्मानचिन्ह व पुरस्काराच्या रकमेचे धनादेश पुरस्कार विजेत्यांना पोस्टाने घरपोच पाठविण्यात येणार आहेत.

नरेंद्र मोहरीर वाङ्मय पुरस्कार डॉ. देवकर्ण मदन यांच्या ‘मराठवाड्यातील साहित्य, समीक्षा आणि संशोधन’ या ग्रंथाला व डॉ. बाळू दुगडूमवार यांच्या ‘बाबा आमटे : व्यक्तित्व, कवित्व व कर्तृत्व’ या ग्रंथांना विभागून जाहीर करण्यात आला आहे. ५ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार नांदेड येथील मनोज बोरगावकर यांच्या ‘नदिष्ट’ या कादंबरीला जाहीर झाला आहे. नागपूर येथील चंद्रकांत वानखेडे यांच्या ‘गांधी का मरत नाही’, या ग्रंथाची निवड प्राचार्य म. भि. चिटणीस वाङ्मय पुरस्कारासाठी झाली आहे. कुसुमताई देशमुख काव्य पुरस्कारासाठी पैठण येथील संदीप जगदाळे यांच्या ‘असो आता चाड’ या कविता संग्रहाची निवड करण्यात आली आहे. बीड येथील सोपान हाळमकर यांच्या ‘वाढण’ या कथा संग्रहाची निवड बी. रघुनाथ कथा, कादंबरी पुरस्कारासाठी झाली आहे. उत्कृष्ट नाटक किंवा नाट्य समीक्षेला देण्यात येणारा कुमार देशमुख नाट्य पुरस्कार नांदेड येथील जगदीश कदम यांच्या ‘वडगाव लाईव्ह’ या नाटकासाठी आणि सुनंदा गोरे यांच्या ‘नवी प्रतिज्ञा’ या बालनाट्यासाठी विभागून देण्यात येणार आहे. या सर्व पुरस्करांचे स्वरुप ३ हजार रुपये रोख असे आहे.

रा. ज. देशमुख स्मृती पुरस्कार पुणे येथील प्रकाशक सुनीताराजे पवार यांना देण्यात येणार असून, २ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रा. शेषराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने ही ग्रंथ निवड केली असून, या समितीमध्ये डॉ.सुरेश सावंत, डॉ.जयद्रथ जाधव, डॉ. संगीता मोरे, डॉ. संभाजी पाटील, डॉ. ज्ञानदेव राऊत यांचाही समावेश होता. रा. ज. देशमुख स्मृती पुरस्काराची निवड प्रकाशक के. एस. अतकरे आणि डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी केली.  

टॅग्स :literatureसाहित्यAurangabadऔरंगाबादmarathiमराठी