शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प अद्याप रिकामेच

By admin | Updated: July 18, 2016 01:10 IST

औरंगाबाद : जुलै महिन्याच्या सुरुवातीला दमदार पाऊस होऊनही मराठवाड्यातील धरणे रिकामीच आहेत. विभागातील सर्व धरणांमध्ये आतापर्यंत केवळ सरासरी ४.५४ टक्केइतकाच जलसाठा होऊ शकला आहे.

औरंगाबाद : जुलै महिन्याच्या सुरुवातीला दमदार पाऊस होऊनही मराठवाड्यातील धरणे रिकामीच आहेत. विभागातील सर्व धरणांमध्ये आतापर्यंत केवळ सरासरी ४.५४ टक्केइतकाच जलसाठा होऊ शकला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर होण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची गरज आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना यंदा भीषण दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले. या जिल्ह्यांमधील शेकडो गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. अजूनही अनेक गावांमधील पाणीटंचाई दूर झालेली नाही. जूनअखेरीस मराठवाड्यातील सर्व धरणे कोरडी पडली होती. विभागातील पाणीसाठा अर्ध्या टक्क्यावर आला होता. जुलैच्या सुरुवातीला मराठवाड्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला. त्यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू झाली; परंतु अजूनही विभागातील धरणे रिकामीच आहेत. १५ जुलैच्या अखेरीस मराठवाड्यातील धरणांमध्ये अवघा साडेचार टक्के इतकाच पाणीसाठा होऊ शकला आहे. सध्या मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी ३.२१ टक्के पाणीसाठा आहे. जायकवाडीसह आठ मोठे प्रकल्प मृतसाठ्यातच आहेत. केवळ तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये जेमतेम १६४ दलघमीचा साठा होऊ शकला आहे. यामध्ये निम्न दुधना, विष्णूपुरी आणि पेनगंगा धरणाचा समावेश आहे. मध्यम प्रकल्पांची स्थितीही अद्याप सुधारलेली नाही. मराठवाड्यातील ७५ मोठ्या प्रकल्पांमध्ये सद्य:स्थितीत केवळ ५४ दलघमी (५.८३ टक्के) साठा आहे. त्याचप्रमाणे विभागातील ७३२ लघु प्रकल्पांमध्ये ११७ दलघमी म्हणजे केवळ ७.३५ टक्के साठा आहे. धरणांमध्ये पुरेसे पाणी न आल्यामुळे शेकडो गावांतील पाणीपुरवठा योजना अजूनही बंदच आहेत. विभागात सिंचन प्रकल्पांवर हजारो गावांच्या पाणीपुरवठा योजना आहेत. पाण्याअभावी या सर्व पाणीपुरवठा योजना जानेवारी महिन्यापासूनच बंद झाल्या होत्या. त्यातील काही प्रकल्पांत पाणी आल्यामुळे त्या सुरू झाल्या आहेत. परंतु अजूनही सर्व गावांतील पाणीटंचाई दूर होण्यासाठी मराठवाड्याला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.