शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण आंदोलन: मराठवाड्यात धग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 01:46 IST

हिंगोली, नांदेड, उस्मानाबादला गुन्हे दाखल

औरंगाबाद : काकासाहेब शिंदे यांच्या जलसमाधीनंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये हिंसेचा उद्रेक झाला. त्यानंतर बुधवारीही मराठवाड्यात आंदोलनाचा निखारा धुमसतच होता. गेवराईत आमदारांच्या घरासमोर तसेच भाजपा संपर्क कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. हिंगोली, जालना, नांदेड जिल्ह्यात ठिय्या, रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी मुंडण आंदोलन केले. उस्मानाबादेत ५० ते ६० आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.गेवराईत भाजपाचे आ. लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलनादरम्यान ‘मराठा आरक्षणासाठी आमदारांनी ठराव मांडावा’ अशी मागणी केली. आ. पवार घराबाहेर येऊन काही बोलणार तोच पोलिसांच्या दिशेने दगडफेक झाली. जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार करण्यात आला. परळीत आठव्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरु होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे , काँग्रेस नेते आ. भाई जगताप, आ. अब्दुल सत्तार, अ. भा. कॉँग्रेस कमेटीचे सदस्य तथा राज्य सरचिटणीस प्रा. टी. पी. मुंडे आदींनी आंदोलकांची भेट घेतली. जालना जिल्ह्यात भोकरदन येथे सामूहिक मुंडण करून शासनाचा निषेध करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यात दगडफेक प्रकरणी ३०० वर आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.नांदेड येथे मंगळवारी आंदोलनादरम्यान पोलिसांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भुजंग पाटील यांच्यासह डॉ. स्मिता कदम आणि काही तरूणांना मारहाण केली़ त्याविरोधात बुधवारी आ. हेमंत पाटील, आ़ नागेश पाटील आष्टीकर, आ़ सुभाष साबणे यांनी रास्ता रोको करीत पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना आणि संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली़ भाजपाचे लोदगा (जि. लातूर) पंचायत समितीचे सदस्य जनार्दन रतन कास्ते यांनी बुधवारी सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द केला.साता-यात लाठीमार, अश्रुधूरसातारा जिल्ह्यात आंदोलकांनी मंगळवारी दुपारी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर तुफान दगडफेक केली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. तसेच अश्रूधुरांच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. दगडफेकीत पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह पाच पोलीस जखमी झाले. सांगलीत ‘जलसमाधी आंदोलन’ करण्यात आले. नदीपात्रात पोलीस, अग्निशमनचे कर्मचारी व पोहणारे युवकही थांबले होते. घोषणा देत सुमारे तासभर कार्यकर्ते नदीपात्रातच बसून होते. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाAurangabadऔरंगाबाद