शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मराठा मावळा संघटनेची छत्रपती संभाजीनगरसाठी 'समर्थन पत्र' मोहीम

By बापू सोळुंके | Updated: March 16, 2023 18:02 IST

निर्णयाच्या समर्थनात विविध राजकिय पक्ष, हिंदूत्ववादी संघटना आणि मराठा समाजातील विविध संघटना मैदानात उतरली आहेत.

छत्रपती संभाजीनगर: शहराचे नामांतर  छत्रपती संभाजीनगर असे करण्याच्या निर्णयाच्या समर्थनात मराठा मावळा संघटनेच्यावतीने टी.व्ही.सेंटर येथे घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजीनगर नावाचे समर्थन करणारे पत्र २६ मार्चपर्यंत भरून घेण्याचा शुभारंभ यावेळी करण्यात आाला.

औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय गत महिन्यात केंद्र सरकारने घेतला. या निर्णयाच्या समर्थनात विविध राजकिय पक्ष, हिंदूत्ववादी संघटना आणि मराठा समाजातील विविध संघटना मैदानात उतरली आहेत. यांतर्गत गुरूवारी सकाळी मराठा मावळा संघटनेचे अध्यक्ष प्रा. माणिकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टी.व्ही. सेंटर येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी जयभवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

यावेळी छत्रपती संभाजीनगर नावाला पाठिंबा देणारे  पत्र मोहीम राबविण्याचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. पहिल्या दिवशी सुमारे तीन हजार नागरीकांची पाठींबा पत्रे भरून घेण्यात आली. २५ मार्चपर्यंत हे पत्रे भरून घेण्यात येतील आणि त्याच दिवशी सर्व पत्रे एकत्रित विभागीय आयुक्तांना देण्यात येणार आहे. या आंदोलनात संघटनेचे प्रदेश अध्यक्ष हनुमंतराव कदम , मराठावाडा अध्यक्ष पंढरीनाथ गोडसे पाटील, शहरजिल्हाध्यक्ष भरत कदम ,ग्रामीण जिल्हाध्यक्ष उदयराज गायकवाड  ,शिवसेना विभाग प्रमुख रघुनाथ  शिंदे, उपजिल्हाध्यक्ष शुभम देशमुख,राहुल मते  , गणेश चौधरी पाटील,सुनील निकम  ,आशिष काळे ,मंगेश डक , आकाश जैस्वाल,रमेश खेडकर  ,भिकन ओपळकर, सुभाष मुरमुडे, भानुदास  पाटील, दिपक नारळे,तानाजी कऱ्हाळे, लक्ष्मण तेले पाटील, गणेश गावंडे,  सुदाम पवार आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद