शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चाचे आत्मक्लेश आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 01:18 IST

मराठा आरक्षणासाठी धरणे आंदोलनाच्या अकराव्या दिवशी रविवारी (दि.२९) क्रांतीचौकात कार्यकर्त्यांनी स्वत:लाच आसूडाने फटके मारून घेत आत्मक्लेश केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी धरणे आंदोलनाच्या अकराव्या दिवशी रविवारी (दि.२९) क्रांतीचौकात कार्यकर्त्यांनी स्वत:लाच आसूडाने फटके मारून घेत आत्मक्लेश केला. या आंदोलनासाठी कार्यकर्त्यांनी पोतराजांचा पारंपरिक पेहराव परिधान केला होता.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी १९ जुलैपासून मराठा क्रांती मोर्चाने क्रांतीचौकात ठिय्या देत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलक रोज वेगवेगळे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधून घेत आहेत. चार दिवसांपूर्वी मुंडन आंदोलन झाले. त्यानंतर शिवचरित्र वाचन तर शनिवारी आंदोलकांनी दिवसभर मराठा आरक्षण आणि समाज याबाबत तरुणांसोबत चर्चा केली. दोन दिवसांपूर्वी राजपूत समाजाने तर शनिवारी मुस्लिम समाजाने मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला. कार्यकर्त्यांवर दाखल गुन्हे मागे घ्यावे, या मागणीसाठी आठ कार्यकर्त्यांनी पुंडलिकनगर येथील जलकुंभावर चढून शासनाचे लक्ष वेधले. गुन्हे परत घेण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाच्या अकराव्या दिवशी रविवारी पदाधिका-यांनी स्वत:वर आसूड ओढून घेतले. एवढ्या दिवसांपासून आंदोलन करूनही सरकार मागण्या मान्य करीत नसल्याने कार्यकर्त्यांनी स्वत:ला चाबकाचे फटके मारून घेतले. हे कार्यकर्ते पोतराजाच्या वेशात होते. या आंदोलनात मनोज गायके, साईनाथ वेताळ, रवींद्र काळे, संतोष काळे पाटील, अंकत चव्हाण, सुनील कोटकर, सुकन्या भोसले, अ‍ॅड. सुवर्णा मोहिते यांच्यासह महिला, तरुणी आणि शेकडो तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाagitationआंदोलन