शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चाच्या बोंबाबोंब आंदोलनाने दणाणले क्रांतीचौक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 19:02 IST

चार महिन्यांपासून केवळ चर्चेचे गु-हाळ चालविणार्‍या या राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने विविध जी.आर.ची ओळी केली आणि सरकारच्या नावाने बोंबा ठोकल्या. 

औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाने ५८ मोर्चे काढल्यानंतरही शासनाने वेळ काढू धोरण स्विकारल्याने आजपर्यंतच्या एका ही जी.आर.ची अंमलबजावणी करण्यात आली नाही. चार महिन्यांपासून केवळ चर्चेचे गु-हाळ चालविणार्‍या या राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने विविध जी.आर.ची ओळी केली आणि सरकारच्या नावाने बोंबा ठोकल्या. 

आज दुपारी १२ वाजता क्रांतीचौकात मराठा क्र ांती मोर्चाच्यावतीने  निदर्शने आणि शासनाच्या जी.आर.च्या होळीचे आयोजन करण्यात आले.  राज्य शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भात काढलेल्या विविध  जी.आर. ची अंमलबजावणी केली जात नाही.  यामुळे या जी.आर.ची होळी करण्यात येत असल्याचे यावेळी पदाधिकार्‍यांनी जाहिर केले. शासनाने मराठा समाजाच्या मागण्या सोडविण्याचे केवळ आश्वासने दिली. जी.आर.चे गाजर दाखविणार्‍या राज्यशासनाच्या निषेध करणार्‍या घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. या घोषणांनी क्रांतीचौक परिसर दणाणला. शिवजयंती ही १९ फेब्रुवारी रोजीच साजरी करण्याचा ठराव क्रांती मोर्चाने घेतला. या ठरावाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन शासनाने दिले. मात्र शासनाने याविषयी अद्यापही निर्णय घेतला नाही. उलट सत्ताधारी युती तिथीनुसार शिवजयंती साजरी करीत आहे. मराठा समाजाच्या मागण्या सोडविण्यासाठी स्वतंत्र आय.एस. दर्जाचा अधिकारी नियुक्त करावा, ही मागणीही शासनाने मान्य केली नाही. राज्यशासनाची प्रतिकात्मक होळी करण्याच्या तयारीत असलेल्या कार्यकर्त्यांच्या हातातून पोलिसांनी होळीचे सामान हिसकावून घेतले. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली.

या आंदोलनात आप्पासाहेब कुढेकर, राजेंद्र जंजाळ, मनोज गायके, सुरेश वाकडे,रविंद्र काळे पाटील, रमेश गायकवाड, विजय काकडे, गजानन पाटील, सतीश वेताळ, योगेश मसलगे, सरोज मसलगे, मुकेश सोनवणे, रंगनाथ खेडेकर,अ‍ॅड.स्वाती नखाते, रेखा वाहटुळे, सोनवणे रमेश केरे पाटील, अंकत चव्हाण, सुनील कोटकर, रविंद्र तांगडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी,पोलीस निरीक्षक अनील आडे, पोलीस निरीक्षक राजर्षी आडे,उपनिरीक्षक धर्मराज देशमुख, संजय बनकर आदींनी बंदोबस्त ठेवला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद