शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये आरटीई प्रवेशाच्या सोडतीकडे अनेक पालकांनी फिरवली पाठ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 19:56 IST

शिक्षण हक्क कायद्यात (आरटीई) नवीन शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के मोफत प्रवेशासाठी आज मंगळवारी पहिली फेरी राबविण्यात आली. पहिली फेरी एक किलोमीटर अंतराच्या परिघातील शाळांसाठी राबविण्यात आली.

औरंगाबाद : शिक्षण हक्क कायद्यात (आरटीई) नवीन शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के मोफत प्रवेशासाठी आज मंगळवारी पहिली फेरी राबविण्यात आली. पहिली फेरी एक किलोमीटर अंतराच्या परिघातील शाळांसाठी राबविण्यात आली. प्रवेशासाठी आॅनलाईन नोंदणी केलेल्या अर्ज क्रमांकानुसार सोडत पद्धतीने (लॉटरी सिस्टिम) निघालेले क्रमांक ‘एनआयसी’कडे पाठविण्यात आले. तथापि, मंगळवारच्या या पहिल्याच फेरीला मात्र अनेक पालकांनी पाठ फिरवल्याचे चित्र सभागृहात दिसून आले. 

यंदा शिक्षण विभागाच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील ५६५ शाळांनी ‘आरटीई’अंतर्गत नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ६ हजार ३७१ जागा निश्चित करण्यात आल्या असून, रविवारी अखेरच्या मुदतीपर्यंत ११ हजार ११६ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी जास्तीत जास्त दहा शाळांसाठी अर्ज केले असले तरी निवास ते शाळा हे एक कि.मी.च्या आत अंतर असणार्‍या विद्यार्थ्यांचा पहिल्या फेरीसाठी विचार करण्यात आला. सिडको परिसरातील संत तुकाराम नाट्यगृहात आयोजित केलेल्या या प्रवेश फेरीला सकाळी ११.३० वाजता सुरुवात झाली.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल, रमेश ठाकूर, श्रीकांत दीक्षित व अन्य कर्मचारी उपस्थित होते.आज सोडत पद्धतीने काढण्यात आलेले क्रमांक ‘एनआयसी’ कार्यालयास पाठविण्यात आले. ‘एनआयसी’कडून उद्या रात्रीपर्यंत पालकांना ‘एसएमएस’द्वारे प्रवेशाबद्दल माहिती कळविण्यात येणार आहे. सोडत पद्धतीने मिळालेल्या शाळेत पालकांनी दिलेल्या मुदतीत आपल्या पाल्यांचा प्रवेश घेणे गरजचे आहे. त्यामुळे ‘एसएमएस’ आल्यानंतर पालकांनी संबंधित शाळेत विहित मुदतीत प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे.

सर्वांसमक्ष काढले नंबर; पारदर्शक प्रक्रियासंत तुकाराम नाट्यगृहात उपस्थित पालकांना राबविण्यात येणार्‍या लॉटरी सिस्टिमबद्दल अगोदर माहिती देण्यात आली. सर्वांसमक्ष काचेची चार भांडे ठेवण्यात आली. त्या चारही काचेच्या भांड्यांत ० ते ९ क्रमांकाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. पालकांसोबत आलेल्या बालकांच्या हाताने चारही भांड्यांतून प्रत्येकी एक अशा चार चिठ्ठ्या काढण्यात आल्या. आॅनलाईन नोंदणी केलेल्या पालकांच्या अर्जांचा क्रमांक चारअंकी असल्यामुळे चार चिठ्ठ्या काढून चारअंकी क्रमांक जोडण्यात आला. अशा पद्धतीने क्रमांक काढून शिक्षण विभागाने पारदर्शक प्रवेश प्रक्रिया राबवली. सदरील काढलेले क्रमांक तात्काळ ‘एनआयसी’ कार्यालयास कळविण्यात आले.