शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चाचणीचे गुण उशिरा पाठविल्याने अनेकजण नापास; महाविद्यालयांच्या दिरंगाईचा विद्यार्थ्यांना फटका  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 16:08 IST

महाविद्यालयातील पदव्युत्तर विभागांनी विद्यार्थ्यांचे अंतर्गत चाचणीचे प्रतिविषय २० गुण निर्धारित वेळेत पाठविले नाहीत. त्यामुळे निकाल जाहीर होताच अंतर्गत चाचणीच्या रकान्यात अनुपस्थिती दर्शविली.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील पदव्युत्तर विभागांनी विद्यार्थ्यांचे अंतर्गत चाचणीचे प्रतिविषय २० गुण निर्धारित वेळेत पाठविले नाहीत. त्यामुळे निकाल जाहीर होताच अंतर्गत चाचणीच्या रकान्यात अनुपस्थिती दर्शविली. यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना नापास व्हावे लागले. या विद्यार्थ्यांचे उशिराने दाखल केलेले गुण ग्राह्य धरता येत नसल्याचा दावा परीक्षा विभागाने केला आहे.

विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांना चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम लागू केलेली आहे. यानुसार एकदा निकाल जाहीर केल्यानंतर पुन्हा त्यामध्ये बदल करता येत नाही. मात्र अनेक महाविद्यालयांनी दिरंगाई करून प्रत्येक विषयासाठी असलेल्या अंतर्गत मूल्यमापनाचे २० गुण विद्यार्थ्यांना दिलेच नाहीत. चाचणी परीक्षा घेऊनही वेळेत परीक्षा विभागाकडे गुण पाठविण्यात आले नाहीत. याचा परिणाम संलग्न महाविद्यालयांतील शेकडो विद्यार्थी उत्तीर्ण होत असताना नापास झाले आहेत. जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांना या २० गुणांपैकी एकही मार्क मिळालेला नसल्यामुळे त्यांचा ग्रेड कमी झाला आहे. चॉईस बेस क्रेडिट सिस्टीममध्ये निकाल रिवाईज करण्याची तरतूदच नसल्याचे परीक्षा विभागाचे म्हणणे आहे. याविषयी वसंतराव नाईक महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राचार्यांनी कुलगुरू, परीक्षा संचालकांशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्यावर कोणीही गांभीर्याने विचार केला नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

परीक्षा विभागानेच लावली सवयपदव्युत्तर अभ्यासक्रमांना तीन वर्षांपूर्वीच सीबीसीए सिस्टीम लागू केलेली आहे. दोन वर्षांपर्यंत परीक्षा विभाग अंतर्गत गुण महाविद्यालयाने सादर केले नसतील तर संबंधित महाविद्यालयांना पत्र पाठवून मागवून घेत असे. महाविद्यालयांनी उशिरा दिलेला गुणांचा अहवाल स्वीकारण्यात येत होता. मात्र या सत्रापासून अचानक हे सर्व बंद करून निकाल जाहीर केले आहेत. तसेच उशिराने दाखल केलेले गुण नाकारले आहेत. या गुणांचा सर्वाधिक फटका विनाकारण विद्यार्थ्यांना बसत आहे.

प्रशासनाने तोडगा काढावाविद्यार्थ्यांची काहीही चूक नसताना, त्यांनी नियमितपणे अंतर्गत चाचणी परीक्षा दिलेली असताना त्यांना गुण नाकारण्यात येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचे नुकसान होत आहे. यावर विद्यापीठ प्रशासनाने लक्ष घालून तोडगा काढवा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.- अमोल दांडगे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय