बीड : सोळाव्या शतकात वीरशैव समाजाची पताका खांद्यावर घेवून मराठी संत साहित्याचा मानबिंदू ठरलेल्या श्री मन्मथ स्वामी यांनी वीर शैव समाजाला प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे़ असे प्रकाश महारूद्र स्वामी महाराजांनी मंगळवारी ‘लोकमत’ शी बोलताना दिली़ बुधवार पासून कपिलधार येथे मन्मथ स्वामींच्या समाधीस्थळी यात्रा महोत्सव सुरू होत आहे़ विविध राज्यांमधून कपिलधार यात्रेसाठी लाखो भाविक एकत्र येतात़ यानिमित्त त्यांच्या जीवन कार्यावर विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे़ मन्मथ स्वामी यांनी बीड तालुक्यातील कपिलधार येथे १५३५ च्या शतकात समाधी घेतली़ शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली म्हणजे महाराष्ट्रातील वीरशैव समाजाचे चैतन्य आहेत़ एवढेच नाही तर मराठी वीरशैव संत साहित्याचे जनक असणाऱ्या माऊलींनी धार्मीक, सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या वीरशैव समाजाला स्वत:चे अस्तित्व मिळवून दिलेले असल्याचे संतसाहित्य अभ्यासकांनी सांगितले़ महिमा मन्मथ स्वामींचाविरशैव समाज हा शिवभक्तीपासून वंचित होता.बदलत्या काळातही समाज हा अंधश्रद्धेच्या चक्रात अंधळा होत असल्याचे स्वीमींच्या निदर्शनास येताच समाजाला दिलासा देण्याचे काम त्यांनी केले आहे. हा समाज मठाच्या वैभवात आणि पिठाच्या अहंकारातच बेधुंद झाला होता. शिवभक्तीकरिता शिवदिक्षा, शिवज्ञान, शिवसंस्कार हे सर्व मार्ग त्यांनी समाजापुढे खुले केले. विरशैव समाजाला जागे करण्यासाठी त्यांनी जंगमाचे व आचार्यांचे मोलाचे सहाकार्य घेतले. माणसा-माणसातील भेदभाव दूर करून समतावादी जीवनपद्धतीचा स्वीकार करण्यास स्वामींनी महत्वाची भूमिका निभावलेली आहे. परकिय आक्रमकांच्या भितीने व स्व स्वरुपाच्या विस्मृतीने घाबरलेल्या समाजाला योग्य दिशा देण्याचे कामही मन्मथ स्वामी यांनी केले आहे. स्वामींच्या प्रयत्नाने वीरशैव समाजाला अनन्यसाधारण महत्वा प्राप्त झाले (प्रतिनिधी)कपिलधार ही कपिलमुनींच्या शिवयोग साधनेची पवित्रभूमी आहे. या भूमीत मन्मथस्वामींचे आगमन झाले, तेव्हापासून कपिलधाराचे भाग्य उदयाला आलेले आहे. मन्मथ स्वामींच्या आगमनाने या परिसरात वीरशैव समाजाचे सुवर्णयुग अवतरले होते. सकल वीरशैव समाजाला आणि कपिलधारचा उद्धार करण्यासाठी मन्मथ स्वामींच्या पदरात टाकण्यात आले होते. कपिलधारला निसर्गरम्य वातारणाने पर्यंटनाचा क्षेत्राचा दर्जा तर मन्मथ स्वामी या भूमीत अवतरल्याने तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे.
मन्मथस्वामींमुळे वाढला वीरशैव समाजाचा लौकिक
By admin | Updated: November 5, 2014 00:58 IST