शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

संस्थान गणपती समोर मानापमान नाट्य; आजी-माजी खासदार भुमरे-खैरे यांच्यात स्टेजवर चकमक

By बापू सोळुंके | Updated: September 7, 2024 19:27 IST

छत्रपती संभाजीनगरचे ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या कार्यक्रमत आजी, माजी खासदारांमध्ये हमरी-तुमरी

छत्रपती संभाजीनगर : ग्रामदैवत संस्थान गणपती येथे एका व्यासपीठावर आलेल्या शिंदेसेना आणि उद्धवसेनेच्या आजी, माजी खासदारांचे मानापमान नाट्य शनिवारी रंगले. खासदार संदीपान भुमरे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात ‘प्रोटोकॉल’वरून शाब्दिक चकमक उडाली.

संस्थान गणपतीच्या आरतीसाठी गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संदीपान भुमरे, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री खा. भागवत कराड, माजी खा. चंद्रकांत खैरे यांच्यासह सर्वच पक्षांचे नेते मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी स्वागतासाठी सर्वप्रथम खैरे यांचे नाव घेतले. यामुळे खा. भुमरे संतापले. त्यांनी घोडेले यांना, ‘प्रोटोकॉल पाळा. देवाच्या ठिकाणी पक्षपात करू नका’, असे कान टोचले. स्टेजवर मंत्री, माजी मंत्री असताना त्यानुसार सन्मान करावा, अशी सूचना केली. तेव्हा घोडेले यांनी मला धर्मसंकटात टाकू नका, असे उत्तर दिले. तेव्हा खैरे यांनी भुमरे यांना उद्देशून 'गप्प रे तू' असा एकेरी उल्लेख केला. भुमरे यांनीही त्यांना 'तूच गप्प बस' असे जशास तसे उत्तर दिले. यानिमित्त आजी, माजी खासदारांमधील हमरी-तुमरी दिसली. खैरेंना आपण माजी झालोय हेच मान्य नाही, असा टोला भुमरे यांनी लगावला.

खैरे चिडचिड करतात- भुमरेपत्रकारांशी बोलताना खा. भुमरे म्हणाले की, मंचावर राज्याचे कॅबिनेट मंत्री सावे, माजी केंद्रीय मंत्री कराड उपस्थित होते. त्यांचा योग्य सन्मान झाला पाहिजे. मी माझ्यासाठी बोलत नव्हतो. खैरे यांना चिडायची गरज नव्हती. मात्र सध्या ते नुसती चिडचिड करतात. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करू, देवाच्या दारी असं व्हायला नको.

धार्मिक कार्यक्रमात कसला प्रोटोकॉल- खैरेखैरे म्हणाले की, माझं स्वागत आधी झालं म्हणून त्यांना राग आला. धार्मिक कार्यक्रमात प्रोटोकॉल नसतो. देवाच्या दरबारात सगळे सारखेच. त्यांचं वागणं बरोबर नाही. त्यांनी चुकीचं केलं. मी भक्त आहे म्हणून शांत बसलो.

टॅग्स :Sandipan Bhumreसंदीपान भुमरेChandrakant Khaireचंद्रकांत खैरेAurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेना