शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मनपाला उत्पन्न वाढीचा विसर

By admin | Updated: August 11, 2014 01:54 IST

नांदेड: शहरातील प्रमुख मालमत्ता गहाण ठेवल्यानंतर महापालिकेने उत्पन्नवाढीकडेही दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे़ मागील सहा महिन्यापासून एलबीटी,

नांदेड: शहरातील प्रमुख मालमत्ता गहाण ठेवल्यानंतर महापालिकेने उत्पन्नवाढीकडेही दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे़ मागील सहा महिन्यापासून एलबीटी, मालमत्ता कर, पारगमन शुल्क, गुंठेवारी या योजनेतून समाधानकारक वसुली झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले़ शहरात विविध विकास योजना राबविणाऱ्या मनपाने आर्थिक उत्पन्नवाढीच्या स्त्रोतांकडे मात्र दुर्लक्ष केले आहे़ आडात असूनही पोहऱ्यात येत नसल्याने दुसऱ्यांकडे भीक मागण्याची वेळ मनपावर आली आहे़ कोट्यवधींच्या कर्जाचा बोजा डोक्यावर घेतलेल्या महापालिकेने आपल्या मालकीच्या प्रमुख मालमत्ता गहाण ठेवल्या आहेत़ केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मागील पाच, सहा वर्षात शहराचा कायापालट झाला़ महापालिकेला जेएनएनयुआरएम, बीएसयुपी व नगरोत्थान योजनेतंर्गत दीड हजार कोटींचे कामे करण्यात आली़ पुढील कामासाठी एक ते दीड हजार कोटी येणे बाकी आहे़ हा निधी मिळविण्यासाठी महापालिकेला स्वत:चा वाटा अगोदर भरावा लागणार आहे़ त्यासाठी मनपाने वेळोवेळी मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेतले आहे़ स्थानिक संस्था कर, मालमत्ता कर, पारगमन शुल्क, पाणीपुरवठा, मलनिस:रण कर, गुंठेवारी हे पालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढीचे स्त्रोत आहेत़ पण या स्त्रोतांकडे सर्वांनीच दुर्लक्ष केल्यामुळे मनपाच्या तिजोरीत खणखणाट आहे़ उत्पन्न वाढीच्या मार्गाकडे दुर्लक्ष करणाऱ्या मनपाला योजनांचा निधी आपल्या फंडात वळती करता येत नाही़ त्यामुळे मागील वर्षभरापासून कर्मचाऱ्यांच्या पगारी वेळेवर होत नसल्याचे चित्र आहे़ (प्रतिनिधी)स्थानिक संस्था कराच्या माध्यमातून मनपाला मिळणारे उत्पन्न सध्या घटल्यामुळे मनपाची स्थिती अवघड झाली आहे़ शासन एलबीटी पाहिजे की जकात यावर विचारमंथन करत आहे़ मात्र मनपाच्या उत्पन्नाला मागील तीन, चार महिन्यापासून ब्रेक मिळाला आहे़ २०११ - १२ मध्ये ४३ कोटी १८ लाख तर २०१३- १४ मध्ये ४५ कोटींच्या जवळपास महसूल मिळाला़ २०१४- १५ मध्ये ७० कोटींची महसूल अपेक्षीत आहे़