शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

भांबरवाडी शिवारातील नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद; ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 14:33 IST

कन्नड  (छ्त्रपती संभाजीनगर) :  तालुक्यातील भांबरवाडी शिवारात मंगळवार रोजी ऋषिकेश राठोड, याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. तेव्हा पासून ...

कन्नड  (छ्त्रपती संभाजीनगर) :  तालुक्यातील भांबरवाडी शिवारात मंगळवार रोजी ऋषिकेश राठोड, याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. तेव्हा पासून या बिबट्याच्या शोधात सर्व वनपरिक्षेत्र विभाग होता. त्यांच्या प्रयत्नाला दिनांक ३० जून रोजी  पहाटे अडीच वाजेच्या दरम्यान  यश आले. हा नरभक्षी बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे.

दि.२८ जून शुक्रवारी रात्री  बिबट्याने  शेळीवर हल्ला करून  शेतकरी बसराज राठोड यांच्या उपळा येथील गट नंबर ३०  मध्ये त्यांच्या शेळीचा  पडश्या पाडला होता. त्याच ठिकाणी वन विभागाने पाला पाचोळा, चारा, गवत लाऊन  (झोपडी वजा) पिंजरा लाऊन त्यात हल्ला केलेल्या शेळीचं उरलेलं मास   टाकून हा ट्रॅप लावला. मासाच्या लालसेने बिबट्या पिंजऱ्यात आला अन सापळ्यात अडकून जेरबंद झाला. 

रात्र न दिवस बिबट्या वर नजर ठेवून केलेल्या या कारवाईत वन विभागाला यश आल्याने भांबरवाडी येथील  ग्रामस्थांनी वन विभागाचे कौतुक करून आभार मानले.यासाठी एस. एन.  मंकावार उप वनसंरक्षण अधिकारी छत्रपती संभाजीनगर , दादा तौर सहाय्यक वनसंरक्षण अधिकारी यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. तसेच बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून वरिष्ठाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असे वनपरिक्षेत्र अधिकारी  रोहिणी साळुंके यांनी सांगित.

बिबट्याला पकडण्यासाठी रोहिणी साळुंके  वनपरिक्षेत्र अधिकारी कन्नड वनपाल आर .डी .पठाण, एस. पी .कादी , एस. एन .नागरे टी .झेड. खरातवनरक्षक  आर. बी. जाधव, एस.एन. नागरगोजे यशोदा साळवे , सोनार यांच्या सह कन्नड, वैजापूर, नागद येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाचे कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :leopardबिबट्या