उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये महिला व बाल कल्याण विभागांतर्गत १० प्रकल्प कार्यालये कार्यरत आहेत. गावे कुपोषणमुक्त करण्यासाठी या यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. मात्र हे प्रयत्न कुठेतरी कमी पडत असल्याने आजही जिल्ह्यामध्ये कुपोषित बालकाचा आकडा साडेसातशेपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे यामध्ये तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या २३ इतकी आहे.जिल्हा कुपोषणमुक्त व्हावा, यासाठी अंगणवाड्यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना बालकांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत. प्रकल्पनिहाय अंगणवाड्यातील बालकांची वजने घेऊन मध्यम आणि तीव्र कमी वजनाची बालके असे वर्गीकरण करण्यात आले आहे. भूम प्रकल्पांतर्गत १० हजार ५०९ बालके आहेत. त्यापैकी ९ हजार ९८९ बालकांचे वजन घेण्यात आले. तसेच कळंब प्रकल्पातील १७ हजार ४०२ पैकी १६ हजार ७७३, उस्मानाबाद १५ हजार १९ पैकी १४ हजार ६२५, तुळजापूर १८ हजार २४२ पैकी १७ हजार ६३५, उमरगा १२ हजार ७६४ पैकी १२ हजार २८३, परंडा १० हजार ८१२ पैकी १० हजार २१३, लोहारा १० हजार ४४४ पैकी १० हजार १६१, वाशी ८ हजार ३३१ पैकी ८ हजार २४२, मुरुम १३ हजार ३०६ पैकी १२ हजार ९२६ आणि तेर प्रकल्पातील १४ हजार ९३ पैकी १३ हजार ४०८ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तपासणी दरम्यान तब्बल ७७७ बालके कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये मध्यम कुपोषित बालकांची संख्या ६१९ तर तीव्र कुपोषित बालके १५८ इतकी आहेत. या बालकांना कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनासोबतच स्थानिक लोकप्रतिनिधींनीही जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचीही गरज निर्माण झाली आहे. आजघडीला सर्र्वाधिक कुपोषित बालकांची संख्या कळंब प्रकल्पांतर्गत असल्याचे पहावयास मिळते. मध्यम कुपोषित १४१ तर तीव्र कुपोषित ३७ बालके आहेत. त्यानंतर तेर प्रकल्पाचा क्रमांक लागतो. मध्यम आणि तीव्र कुपोषित बालकांची संख्या अनुक्रमे ९० व २३ इतकी आहे. परंडा प्रकल्पांतर्गतही ९६ कुपोषित बालके आहेत. (प्रतिनिधी)ग्राम बालविकास केंदे्र निधीअभावी रखडलीबालकांना कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अंगणवाडी स्तरावर ग्राम बालविकास केंद्रे सुरु करण्यात येतात. महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने ९८ केंद्रे सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र या केंद्रासाठी लागणारा अपेक्षित निधी उपलब्ध न झाल्यामुळे यातील बरीचशी केंद्रे सुरु होऊ शकलेली नाहीत. त्यामुळे कुपोषित बालकांचा आकडाही जैसे थे अवस्थेत असल्याचे पहावयास मिळते. काही वर्षापूर्वी अंगणवाड्यांच्या माध्यमातून अशा बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात होत्या. त्यामध्ये गोपाळकट्टा, गोपाळ पंगत आदींचा समावेश असे. मात्र या उपाययोजना काही प्रमाणात मंदावल्या आहेत. त्यांनाही गती देण्याची गरज व्यक्त होत आहे.असे आहे जिल्ह्याचे चित्रप्रकल्पमध्यम तीव्र कुपोषितकुपोषितभूम६१०८कळंब१४१३७उस्मानाबाद३०१६तुळजापूर८००९उमरगा१८०८परंडा७०२७लोहारा५३१४वाशी६०१२मुरुम१६०४तेर९०२३
साडेसातशेवर बालके कुपोषित
By admin | Updated: July 25, 2014 00:29 IST